शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi नं भारतात लाँच केला नवीन स्वस्त स्मार्टफोन; असे आहेत दमदार Redmi Note 11 चे स्पेक्स  

By सिद्धेश जाधव | Updated: February 9, 2022 13:36 IST

Xiaomi Redmi Note 11: Xiaomi Redmi Note 11 स्मार्टफोन 6GB RAM, Snapdragon 680 चिपसेट, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह लाँच झाला आहे.

Xiaomi नं आपल्या रेडमी नोट सीरीजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं भारतात Redmi Note 11S आणि Xiaomi Redmi Note 11 असे दोन हँडसेट बजेटमध्ये उतरवले आहेत. या लेखात आपण आपण रेडमी नोट 11 स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत. जो 6GB RAM, Snapdragon 680 चिपसेट, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह ग्राहकांच्या भेटीला आला आहे.  

Xiaomi Redmi Note 11 चे स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi Redmi Note 11 स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच-होल डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. यातील एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजी 8 जीबी पर्यंत रॅम वाढवण्यास मदत करते.  

फोटोग्राफीसाठी या रेडमी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

बेसिक कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये 3.5एमएम जॅक, आयआर ब्लास्टर मिळतो तर सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक आहे. हा रेडमी फोन आयपी53 रेटेड आहे त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून याचे संरक्षण होते. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 11 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

Xiaomi Redmi Note 11 ची किंमत 

रेडमी नोट 11 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट्स भारतात आले आहेत. या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलसाठी 15,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन Amazon India, Mi.com, Mi Home आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून Starburst White, Space Black आणि Horizon Blue कलरमध्ये विकत घेता येईल. 

हे देखील वाचा:

लाँच होण्याआधीच Redmi च्या स्वस्त स्मार्टफोननं दाखवला दम; मोठया बॅटरीसह येणार बाजारात

हे आहेत 6 'बेस्ट' पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप्स जे तुम्हाला कधीच विसरू देणार नाहीत महत्वाचे लॉगिन डिटेल्स

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान