शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

आजपासून विकत घेता येईल शाओमीचा Mi TV 4A 40 Horizon Edition स्मार्टटीव्ही; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Updated: June 2, 2021 12:29 IST

Xiaomi Mi TV 4A 40 launched: Xiaomi Mi TV 4A 40 2 जूनपासून 23,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.  

Xiaomi ने Xiaomi Mi TV 4A 40 स्मार्टटीव्ही भारतात लाँच केली आहे. हि टीव्ही गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये भारतात लाँच केल्या गेलेल्या स्मार्ट टीव्ही सीरीज Mi TV 4A Horizon Edition मध्ये लाँच करण्यात आली आहे. याआधी या सिरीजमध्ये 32 आणि 43 इंचाचे दोन मॉडेल आहेत, हा नवीन मॉडेल 40 इंचाच्या स्क्रीनसह येतो. (Xiaomi Mi TV 4A 40 launched in India with price tag of 23,999 Rs.) 

Mi TV 4A 40 Horizon Edition स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

Xiaomi च्या या नव्या Mi TV 4A 40 Horizon Edition स्मार्टटीव्हीचे सर्व स्पेसिफिकेशन्स जुन्या 43-इंचाच्या वेरिएंट्स सारखे आहेत. दोघांमध्ये फरक फक्त डिस्प्ले पॅनलच्या आकाराचा आहे. नवीन 40-इंच LED-backlit LCD पॅनलमध्ये रिजोल्यूशन 1920 x 1080 पिक्सल (FHD), 60Hz रिफ्रेश रेट, 178° व्यूविंग अँगल आणि रिस्पॉन्स टाइम 9.5ms आहे. 64-bit Amlogic चिपसेट असलेल्या या स्मार्टटीव्हीमध्ये चार ARM Cortex-A53 CPU कोर आणि ARM Mali-450 MP3 GPU देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टटीव्ही 1GB RAM आणि 8GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला गेला आहे. 

शाओमीचा हा टीव्ही कंपनीच्या PatchWall ओएसवर चालतो, जो Android TV Pie ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. या टीव्हीमध्ये सर्व लोकप्रिय स्ट्रीमिंग अ‍ॅप्ससह Chromecast, Google Play Store, आणि Google Assistant सपोर्ट देण्यात आला आहे.  

साउंड आउटपुटसाठी शाओमीच्या टीव्हीमध्ये 20W चे स्पीकर देण्यात आले आहेत ज्यात DTS-HD सपोर्ट आहे. त्याचबरोबर टीव्ही सिंगल बँड WiFi, Bluetooth 4.2, तीन HDMI पोर्ट, दोन USB 2.0 पोर्ट, AV (मिनी), Antenna, S/PDIF, 3.5mm हेडफोन जॅक आणि Ethernet पोर्ट अश्या फीचर्सना सपोर्ट करतो. 

Mi TV 4A 40 Horizon Edition ची किंमत 

Xiaomi च्या Mi TV 4A 40 Horizon Edition ची किंमत 23,999 रुपये आहे. या सिरीजमधील 32-इंचाचा मॉडेल 15,000 रुपयांमध्ये तर 43-इंचाचा वेरिएंट 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 2 जूनपासून नवीन मॉडेल Mi.com, Flipkart, Mi Home रिटेल स्टोर आणि कंपनीच्या पार्टनर स्टोरवरून विकत घेता येईल.  

टॅग्स :xiaomiशाओमी