शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

Mi स्मार्टफोन्सचा अंत! आता मिळणार नाहीत ‘एमआय’ चे फोन्स; Xiaomi ने बंद केला ब्रँड  

By सिद्धेश जाधव | Updated: August 24, 2021 16:07 IST

Xiaomi Dropping Mi Branding: Xiaomi आपल्या प्रोडक्ट्सवर Mi ब्रँडिंगचा वापर बंद करणार आहे. याची सुरवात MIX 4 पासून करण्यात आली आहे.  

Xiaomi चे स्मार्टफोन्सची किंमत त्याच्या ब्रॅंडिंगवरून सहज समजते. कंपनीचा रेडमी ब्रँड लो बजेट आणि बजेट स्मार्टफोन्स सादर करतो. तर मी ब्रँड अंतर्गत प्रीमियम स्मार्टफोन्स आणि प्रोडक्टसस सादर केले जातात. याव्यतिरिक्त कंपनीने सब-ब्रँड पोको देखील सादर केला आहे जो बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्स सादर करतो. परंतु आता कंपनीच्या ब्रॅंडिंगमध्ये मोठे बदल होणार आहेत. कंपनीने आता आपल्या प्रोडक्ट्सची Mi ब्रँडिंग बंद करणार आहे. XDA डेवलपर्सने दिलेल्या माहितीनुसार कंपनी आता Xiaomi ब्रँडिंगचा वापर करून डिवाइस सादर करणार आहे.  (New Premium Xiaomi Smartphones Will Not Come Under MI Brand)

या बद्दलची सुरवात अलीकडेच लाँच झालेल्या MIX 4 पासून करण्यात येईल. हा अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असेलला कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. हा प्रीमियम स्मार्टफोन असून देखील Mi ब्रँड अंतर्गत हा स्मार्टफोन उपलब्ध होणार नाही. या बदलामागील कोणतेही कारण शाओमीने अजूनतरी सांगितलेले नाही. तसेच हा बदल नवीन प्रोडक्टससह जुन्या प्रोडक्टसमध्ये देखील दिसेल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.  

भारतात शाओमीचे तीन ब्रँड उपलब्ध आहेत. यातील रेडमी आणि मी म्हणजेच एमआय या नावानी कंपनी जास्त ओळखली जाते. या नव्या ब्रॅंडिंगचा डावपेच उपयोगी ठरेल कि नाही ते येत्या काळात समजेल. लवकरच कंपनीने Mi 11T आणि Mi 11T Pro स्मार्टफोन सादर करणार आहे, हे स्मार्टफोन कोणत्या ब्रँडिंगसह येतील ते बघावे लागेल. हे देखील वाचा:  पुढल्या महिन्यात iQOO 8 येऊ शकतो भारतात; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार फ्लॅगशिप प्रोसेसर

Mi 11T Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

Mi 11T Pro स्मार्टफोन प्लास्टिक बॅक पॅनल आणि मेटल फ्रेमसह सादर केला जाईल. यात पंच-होल कटआउटसह 120Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. या स्मार्टफोनमधील प्रोसेसरची ठोस माहिती समोर आली नाही. यात स्नॅपड्रॅगॉनचा 888 किंवा 888+ प्रोसेसर असू शकतो. हा फोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर चालेल. हे देखील वाचा:  गेमिंग चिपसेटसह Redmi 10 Prime येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतो लाँच

युट्युब व्हिडीओमध्ये Mi 11T Pro मध्ये Mi 11 Lite सारखा कॅमेरा सेटअप मिळेल, असे सांगण्यात आले आहे. म्हणजे या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळेल. या फोनमधील 5,000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात येईल. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोन