गेमिंग चिपसेटसह Redmi 10 Prime येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतो लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: August 23, 2021 06:52 PM2021-08-23T18:52:29+5:302021-08-23T18:55:39+5:30

Redmi 10 Prime Launch: Xiaomi आगामी फोनसाठी ‘ऑल राउंड सुपरस्टार’ टॅगलाइनचा वापर करत नवीन टीजर शेयर केला आहे. हा स्मार्टफोन Redmi 10 Prime आहे कि नाही याची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही.

Xiaomi confirms new redmi smartphone launch in india can be redmi 10 prime  | गेमिंग चिपसेटसह Redmi 10 Prime येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतो लाँच 

गेमिंग चिपसेटसह Redmi 10 Prime येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतो लाँच 

Next
ठळक मुद्दे या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे.Xiaomi Redmi 10 मध्ये कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

शाओमीची बजेट स्मार्टफोन सीरिज ‘रेडमी’ गेले कित्येक दिवस चर्चेत आहे. या सीरिजमध्ये कंपनी नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनीने Redmi 10 स्मार्टफोन मलेशियात सादर केला आहे. हाच स्मार्टफोन भारतात Redmi 10 Prime म्हणून सादर केला जाईल अशी माहिती गेल्या आठवड्यात आली होती. आता या स्मार्टफोनबाबत कंपनीने नवीन टीजर सोशल मीडियावर शेयर केला आहे.  

Xiaomi आगामी फोनसाठी ‘ऑल राउंड सुपरस्टार’ टॅगलाइनचा वापर करत नवीन टीजर शेयर केला आहे. हा स्मार्टफोन Redmi 10 Prime आहे कि नाही याची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. टीजर सोबतच Xiaomi ने फोनसाठी माइक्रोसाइट देखील बनवली आहे. या साईटवर या स्मार्टफोनची थोडी माहिती देण्यात आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा Redmi 10 Prime स्मार्टफोन असून येत्या 3 सप्टेंबरला हा स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येईल. हे देखील वाचा: फक्त 1,399 रुपयांमध्ये Lava Pro Buds 2 इयरबड्स भारतात लाँच; कम किंमतीत मिळणार पावरफुल साउंड

Redmi 10 Prime चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Redmi 10 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल कट-आऊटसह येणार हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात उजव्या पॅनलवर पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, IR blaster, Qj 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत.  

लाँच पूर्वी शाओमीने सांगितल्याप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. हा एक गेमिंग चिपसेट आहे असे कंपनीने म्हटले होते. या रेडमी फोनमध्ये 6GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंतची eMMC स्टोरेज देण्यात आली आहे. हा बजेट स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आधारित MIUI 12.5 वर चालतो. हे देखील वाचा: स्वस्त 5G स्मार्टफोन झाला अजून स्वस्त; Realme Narzo 30 5G चा छोटा व्हेरिएंट बाजारात लाँच

Xiaomi Redmi 10 मध्ये कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या रेडमी नव्या फोनमधील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Xiaomi confirms new redmi smartphone launch in india can be redmi 10 prime 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.