शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

20,000mAh ची दमदार पॉवर बँक आणि Xiaomi Beard Trimmer 2 भारतात लाँच; इथून घेता येणार विकत  

By सिद्धेश जाधव | Updated: September 30, 2021 12:38 IST

Xiaomi Powerbank and Trimmer: शाओमीने हायपरसॉनिक पॉवरबँक आणि Xiaomi Beard Trimmer 2 भारतात लाँच केले आहेत.  

शाओमीने दोन नवीन प्रोडक्ट भारतात सादर केले आहेत. यात Xiaomi Beard Trimmer 2 आणि Mi Power Bank Hypersonic चा समावेश आहे. कंपनीचा नवीन ट्रीमर IPX7 वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे. तर Mi Power Bank Hypersonic ची बॅटरी क्षमता 20,000mAh आहे. ही पॉवरबँक 50W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीस सपोर्ट करते आणि USB Power Delivery 3.0 च्या मदतीने लॅपटॉप 45W स्पीडने चार्ज करू शकते.  

किंमत  

Xiaomi Beard Trimmer 2 ची किंमत 1,999 रुपये आहे. हा ट्रीमर फेस्टिव सेलमध्ये इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Mi Power Bank Hypersonic ची किंमत 3,599 रुपये आहे. हे दोन्ही प्रोडक्ट Mi.com, मी होम स्टोर्स, मी स्टुडिओ, अ‍ॅमेझॉन इंडिया आणि ऑफलाइन स्टोर्सच्या माध्यमातून 3 ऑक्टोबरपासून विकत घेता येतील.  

Xiaomi Beard Trimmer 2  

Xiaomi Beard Trimmer 2 मध्ये स्टेनलेस स्टील, सेल्फ-शार्पिंग ब्लेड देण्यात आले आहेत. 0.5mm च्या अचूकतेने 40 लेंथ सेटिंग्ससह ट्रिमिंग करतो. यातील ब्लेड दरमिनिटाला 6,000 रोटेट होतात. ट्रीमरमध्ये बॅटरी लेव्हल दाखवण्यासाठी एलईडी बॅटरी डिस्प्ले देण्यात आला आहे. 2 तासांत फुल चार्ज झाल्यानंतर हा ट्रीमर 90 मिनिटे वापरता येतो. हा ट्रीमर कोर्डसह देखील वापरता येईल. तसेच IPX7 रेटिंगमुळे हा पाण्याने धुता देखील येतो.  

Mi Power Bank Hypersonic  

Mi HyperSonic Power Bank मध्ये 20,000mAh कपॅसिटी वाली लिथियम पॉलीमर बॅटरी आहे. या द्वारे जास्तीत जास्त 50W चार्जिंग स्पीडने डिवाइस चार्ज करता येतात. यात दोन यूएसबी टाइप-ए पोर्ट आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहेत. Mi HyperSonic Power Bank मध्ये ब्लूटूथ हेडसेट, फिटनेस बँड आणि स्मार्टवॉच सारख्या डिवाइससाठी लो पावर चार्जिंग मोड देण्यात आला आहे.  

Mi HyperSonic पावर बँक 45W चार्जिंग स्पीडने चार्ज करता येते आणि ही पावर बँक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 तास 50 मिनिटांचा वेळ लागतो. या पावर बँक द्वारे Lenovo L480 लॅपटॉप 2 तास 27 मिनिटे, Mi 11X Pro स्मार्टफोन 1 तास 5 मिनिटे आणि Mi Watch Revolve स्मार्टवॉच 2 तास 20 मिनिटांत चार्ज केले जाऊ शतकात, असा दावा कंपनीने केला आहे. Mi HyperSonic Power Bank मध्ये 16-लेयर चिप प्रोटेक्शन, टेम्परेचर रेजिस्टन्स, ओवर-वोल्टेज प्रोटेक्शन, शटडाउन प्रोटेक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रोटेक्शन, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन आणि असे अनेक फीचर्ससह देण्यात आले आहेत.   

टॅग्स :xiaomiशाओमी