शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi 12: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi स्मार्टफोन लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर 

By सिद्धेश जाधव | Updated: December 28, 2021 21:54 IST

Xiaomi 12: Xiaomi नं आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro सादर केले आहेत.

Xiaomi 12: Xiaomi नं आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजमध्ये Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर हे फोन्स अखेरीस बाजारात आले आहेत. चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका इव्हेंटमधून कंपनीनं Qualcomm Snapdragon 8Gen 1 प्रोसेसरसह येणारा हा पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. या लेखात आपण वॅनिला शाओमी 12 ची माहिती घेणार आहोत.  

Xiaomi 12 चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi 12 या फ्लॅगशिप फोनमध्ये 6.28 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कर्व्ड डिजाइन, सेंटर अलाइंड पंच-होलसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येणार हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसच्या सुरक्षेसह बाजारात आला आहे.  

हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो. या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि डॉल्बी विजनसह Harman Kardon speakers मिळतील. Xiaomi 12 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC मिळतो. फोन 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये कंपनीनं 4,500mAh ची बॅटरी, 67W फास्ट वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिवर्स वायरलेस चार्जिंगसह दिली आहे.  

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा Sony IMX 766 सेन्सर प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जो OIS (ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन) फीचरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 13MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 5MP चा सुपर मॅक्रो कॅमेरा मिळेल. फोन 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. 

किंमत 

  • Xiaomi 12 8GB/128GB: 3699 युआन (जवळपास 43,480 रुपये) 
  • Xiaomi 12 8GB/256GB: 3999 युआन (जवळपास 46,884 रुपये) 
  • Xiaomi 12 12GB/256GB: 4399 युआन (जवळपास 51,5574 रुपये) 
टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड