म्युजिकचा दमदार अनुभव देण्यासाठी Xiaomi 11T Pro मध्ये Harman Kardon चे स्पीकर, उरले फक्त काही दिवस  

By सिद्धेश जाधव | Published: January 14, 2022 12:21 PM2022-01-14T12:21:29+5:302022-01-14T12:21:47+5:30

Xiaomi 11T Pro Price In India: Xiaomi 11T Pro स्मार्टफोन भारतात Harmon Kardon ट्यून ड्युअल रियर स्पिकरसह सादर केला जाऊ शकतो.  

Xiaomi 11t pro price in india and variant specifications leaked   | म्युजिकचा दमदार अनुभव देण्यासाठी Xiaomi 11T Pro मध्ये Harman Kardon चे स्पीकर, उरले फक्त काही दिवस  

म्युजिकचा दमदार अनुभव देण्यासाठी Xiaomi 11T Pro मध्ये Harman Kardon चे स्पीकर, उरले फक्त काही दिवस  

Next

Xiaomi 11T Pro स्मार्टफोन भारतात 19 जानेवारीला लाँच केला जाणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. हा एक प्रीमियम सेगमेंटमध्ये सादर होणारा स्मार्टफोन असेल. याची किंमत 40 ते 50 हजार दरम्यान असू शकते. त्यानुसार या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन देखील दमदार असतील. याचा अंदाज या फोनमध्ये मिळणाऱ्या Harman Kardaon स्पीकरवरून मिळतो.  

MySmartPrice नं आगामी Xiaomi 11T Pro स्मार्टफोनच्या भारतीय व्हेरिएंटची माहिती दिली आहे, त्यानुसार हा Harmon Kardon ट्यून ड्युअल रियर स्पिकरसह सादर केला जाऊ शकतो. ही एक ऑडिओ प्रोडक्ट्स बनवणारी प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनीनं या स्पिकर्सचा वापर Xiaomi Mi 11 Ultra मध्ये देखील केला होता. हा फोन 8GB/128GB, 8GB/256GB आणि 12GB/256GB अशा तीन व्हेरिएंटची माहिती देखील रिपोर्टमधून समोर आली आहे.  

Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स    

Xiaomi 11T Pro मध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे. 

या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. फोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

हे देखील वाचा:

हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket

108MP कॅमेऱ्यासह Xiaomi सादर करणार स्वस्त 5G Phone; लोकांना वेड लावेल Redmi Note 11S

Web Title: Xiaomi 11t pro price in india and variant specifications leaked  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.