शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

दमदार डील! Xiaomi चा सर्वात स्लिम 5G Phone मिळतोय स्वस्तात; 7,500 रुपयांची होणार बचत  

By सिद्धेश जाधव | Updated: December 16, 2021 19:53 IST

Xiaomi 11 Lite NE 5G: 31,999 रुपयांमध्ये लाँच झालेला Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi 11 Lite NE 5G हा भारतातील सर्वात स्लिम फोन आहे, असा दावा कंपनीनं केला आहे. या फोनवर आता डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅमेझॉननं या फोनवर 7,500 रुपयांच्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. तसेच एक्सचेंज ऑफर अंतगर्त 5 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल.  

31,999 रुपयांमध्ये लाँच झालेला Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं हा फोन विकत घेतल्यास 2500 रुपयांपर्यंतचा अ‍ॅडिशनल डिस्काउंट देखील मिळू शकतो.  

Xiaomi 11 Lite NE 5G चे स्पेसिफिकेशन्स    

या फोनमध्ये 6.55-इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन, डॉल्बी व्हिजन, HDR10+, 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा वापर केला आहे. हा एक 5G प्रोसेसर आहे. तसेच फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते.    

या फोनमध्ये MIUI 12.5 ही कंपनीची कस्टम स्किन देण्यात आली आहे, जी Android 11 वर आधारित आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Xiaomi 11 Lite 5G NE नावाप्रमाणे पातळ आणि हलका फोन आहे, ज्याची जाडी 6.81mm आणि वजन फक्त 158 ग्राम आहे. या फोनमध्ये 12 5G बँड देण्यात आले आहेत.    

फोटोग्राफीसाठी Xiaomi 11 Lite 5G NE च्या बॅक पॅनलवर तीन कॅमेरे असलेला सेटअप मिळतो. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची वाईड-अँगल लेन्स आणि 5MP चा टेलीमॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंट पॅनलवरील 20MP चा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉल करण्याच्या कामी येतो. पॉवर बॅकअपसाठी या डिवाइसमध्ये 4,250mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.   

हे देखील वाचा: 

एक एसएमएस पाठवून देखील मतदान ओळखपत्राला आधार कार्ड जोडता येतं; जाणून घ्या पद्धत

फ्लिपकार्टचा जबरदस्त सेल सुरु; हे 8 मोबाईल फोन मिळतायत स्वस्तात....आयफोनही

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड