शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

Xiaomi च्या सर्वात स्लिम 5G फोनवर 5,500 ऑफ; फोनमध्ये 8GB RAM आणि 64MP कॅमेरा 

By सिद्धेश जाधव | Updated: January 6, 2022 17:48 IST

Xiaomi 11 Lite NE 5G वर कंपनीच्या फ्लॅगशिप डेज सेल अंतर्गत सूट दिली जात आहे. गेल्यावर्षी लाँच झालेला हा फोन कंपनीच्या नवीन 5G Phones मुळे स्वस्तात मिळत आहे.  

Xiaomi नं गेल्यावर्षी सर्वात स्लिम 5G Phone भारतात सादर केला होता. Xiaomi 11 Lite NE 5G हा कंपनीचा वजनाने सर्वात हलका स्मार्टफोन देखील आहे. आता हा फोन शाओमीच्या फ्लॅगशिप डेज सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटसह विकत घेण्याची संधी देण्यात आली आहे. हा डिस्काउंट आजच आलेल्या Xiaomi 11i HyperCharge 5G आणि Xiaomi 11i 5G या स्मार्टफोन्समुळे दिला जात असल्याची चर्चा आहे. 

Xiaomi 11 Lite NE 5G ची किंमत 

Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट सध्या 21,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही किंमत शाओमी फ्लॅगशिप डे पूर्ती मर्यादित असेल. हा सेल 10 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या डिस्काउंटसाठी कंपनीच्या वेबसाईटवरील विविध ऑफर्सची मदत घ्यावी लागेल.  

Xiaomi 11 Lite NE 5G चे स्पेसिफिकेशन्स     

या फोनमध्ये 6.55-इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन, डॉल्बी व्हिजन, HDR10+, 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा वापर केला आहे. हा एक 5G प्रोसेसर आहे. तसेच फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते.     

या फोनमध्ये MIUI 12.5 ही कंपनीची कस्टम स्किन देण्यात आली आहे, जी Android 11 वर आधारित आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Xiaomi 11 Lite 5G NE नावाप्रमाणे पातळ आणि हलका फोन आहे, ज्याची जाडी 6.81mm आणि वजन फक्त 158 ग्राम आहे. या फोनमध्ये 12 5G बँड देण्यात आले आहेत.     

फोटोग्राफीसाठी Xiaomi 11 Lite 5G NE च्या बॅक पॅनलवर तीन कॅमेरे असलेला सेटअप मिळतो. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची वाईड-अँगल लेन्स आणि 5MP चा टेलीमॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंट पॅनलवरील 20MP चा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉल करण्याच्या कामी येतो. पॉवर बॅकअपसाठी या डिवाइसमध्ये 4,250mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.    

हे देखील वाचा:

तुम्ही तयार होण्याआधीच फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; 108MP कॅमेरा काढणार शानदार फोटो

फक्त 139 रुपयांमध्ये घरी आणा SmartWatch; सिंगल चार्जमध्ये 5 दिवस वापरा Fire-Boltt Ultron

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड