शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Nokia 6 (2018) हा स्मार्टफोन आज लॉन्च होणार? लीक झाले फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:05 IST

स्मार्टफोन मार्केटमध्ये अग्रेसर असलेल्या नोकिया कंपनीचा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन नोकिया 6 शुक्रवारी लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत नोकिया कंपनीकडून अद्याप कोणत्याही खुलासा करण्यात आली नाही.

ठळक मुद्देआज नोकिया 6 हा स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतोस्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा फुल एचडी 1920 x 1080 डिस्प्ले या स्मार्टफोनमध्ये 32 जीबी आणि 64 जीबी मेमरीचा पर्याय देण्यात

मुंबई : स्मार्टफोन मार्केटमध्ये अग्रेसर असलेल्या नोकिया कंपनीचा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन नोकिया 6 शुक्रवारी लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत नोकिया कंपनीकडून अद्याप कोणत्याही खुलासा करण्यात आली नाही. एका रिपोर्टनुसार, शुक्रवारी (दि. 5) म्हणजेच आज नोकिया 6 हा स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतो. याचबरोबर या स्मार्टफोनचे स्फेसिफिकेशनही लीक झाल्याचा दावा एका चीनच्या रिटेलरने केला आहे. याबाबतचा एक टीझर विबो या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आला आहे. लीकच्या झालेल्या स्पेसिफिकेशनबाबत सांगायचं तर नोकियाची सहकारी कंपनी एचएमडी ग्लोबल नवीन स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा फुल एचडी 1920 x 1080 डिस्प्ले देऊ शकते. तसेच, स्मार्टफोनचा हा डिस्प्ले 18:9 च्या ऑस्पेक्ट रेशोसोबत येईल, असे सांगण्यात येत आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 630 प्रोसेसर असणार आहे. तसेच, 4 जीबी रॅमसोबत असेल. 2018 मध्ये रिलीज होणा-या या डिव्हाईसच्या पाठीमागे फिंगरप्रिन्ट स्कॅनरची सुविधा असणार आहे. यासोबतच नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये 32 जीबी आणि 64 जीबी मेमरीचा पर्याय देण्यात आलाय. अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जनची माहिती सध्या समोर आलेली नाहीये. पण त्यात 8 मेगापिक्सल आणि 16 मेगापिक्सल कॅमेरा असेल. सोबतच फोनमध्ये रिअर माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता आहे. नोकिया 6 स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीला मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. याशिवाय, नोकिया 6 मध्ये तीन हजार एमएएच पावरची बॅटरी दिली जाऊ शकते. एचएमडी ग्लोबलने अद्याप नोकिया 6 स्मार्टफोनबाबत अद्याप कोणतीही पुष्टी दिली नाही. परंतू हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांत मार्केटमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या 19 जानेवारीला चीनमध्ये नोकिया कंपनी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. यामध्ये नोकिया 6, नोकिया 9, नोकिया 8, नोकिया 4 , नोकिया 7 प्लस आणि नोकिया 1 असे स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल