शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टी-शर्टवर का, मोबाइलवर डाऊनलोड करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 05:14 IST

लवकरच लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांसाठी लोकलसारख्या अत्यावश्यक सेवा खुल्या केल्या जाण्याची शक्यता आहे. अशावेळी तुमचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

- - प्रसाद ताम्हनकर (prasad.tamhankar@gmail.com)

सामान्य जनतेच्या सोयीसाठी सध्या सरकारने अनेक ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येत असल्याने अनेक लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापरदेखील करत आहेत. mParivahan आणि MyGov ही अशीच दोन महत्त्वाच्या सेवा देणारी ॲप आहेत, जी तुमच्या मोबाइलमध्ये असायलाच हवीत. लवकरच लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांसाठी लोकलसारख्या अत्यावश्यक सेवा खुल्या केल्या जाण्याची शक्यता आहे. अशावेळी तुमचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. आता सरकारने ही सेवा अधिक सुटसुटीत करण्याच्या हेतूने लसीकरणाचे सर्टिफिकेट MyGov या ‘चॅटबॉट’च्या माध्यमातून व्हॉट्सॲपवरदेखील उपलब्ध करून दिले आहे. यासाठी तुम्हाला आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये  919013151515 हा नंबर सेव्ह करायचा आहे. त्यानंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ह्या नंबरवर Download Certificate असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाइलवर एक सहा अंकी OTP येईल. तो मेसेज केल्यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरद्वारे  जितक्या लोकांची लसीकरणासाठी नोंदणी केली असेल, त्यांची नावे क्रमवार दिसतील. हव्या त्या व्यक्तीचा नंबर मेसेज केल्यानंतर, त्या व्यक्तीच्या नावाचे सर्टिफिकेट PDF फाइलच्या स्वरूपात त्वरित उपलब्ध करून दिले जाईल.  दुसरी महत्त्वाची सेवा पुरवणारे ॲप म्हणजे mParivahan. बरेचदा कामाच्या गडबडीत आपण ड्रायव्हिंग लायसन्स अथवा गाडीची कागदपत्रे घरीच विसरून जातो. अशा वेळी पोलिसांनी तपासणी केल्यास, दंड भरण्याशिवाय दुसरा पर्यायदेखील उपलब्ध नसतो. बरेचदा लायसन्स अथवा गाडीच्या कागदपत्रांचे मोबाइलमध्ये सेव्ह केलेले फोटो पोलीस ग्राह्य धरत नाहीत आणि वाद होतात. आता कायदेशीररीत्या मान्य होतील अशी कागदपत्रे मोबाइलमध्ये ठेवण्याची सोय सरकारद्वारे करण्यात आली आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे RC डाऊनलोड करून घेऊ शकता आणि मोबाइलमध्ये ‘डिजिटल’ स्वरूपात सेव्हसुद्धा करून ठेवू शकता. यामुळे कागदपत्रे घेऊन हिंडणे, त्यांची वाऱ्या-पावसात काळजी घेणे अशा सगळ्या कटकटींपासूनदेखील सुटका मिळणार आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस