शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर माणसं अस्वस्थ का?; सतत ऑनलाईन असण्याचा जबरदस्त थकवा येऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 08:32 IST

राग ही आदिम भावना आहे आणि तो आपल्या सगळ्यांना येतो. पण, सोशल मीडियावर त्याचं रूप ओंगळवाणं बनून जातं.

ऑनलाईन जगात जशी धमाल असते, अगणित फायदे असतात, गॉसिप असतं, दोस्ती असते तसाच प्रचंड रागही असतो आणि तो सातत्याने दिसत असतो. मग, ते ट्रोलिंग असो, हेट कॉमेन्ट्स असोत नाहीतर गॉसिपच्या नावाखाली सातत्याने व्यक्त होणारा राग असो. ऑनलाईन जगात वावरताना हा राग सतत दिसतो, जाणवतो आणि त्याचा त्रासही भोगण्याची वेळ येऊ शकते. 

राग ही आदिम भावना आहे आणि तो आपल्या सगळ्यांना येतो. पण, सोशल मीडियावर त्याचं रूप ओंगळवाणं बनून जातं. अनोळखी माणसांवर विनाकारण आपण का रागावलेलो असतो हे समजून घेतलंच पाहिजे. सोशल मीडियावर माणसं सतत अस्वस्थ असतात. आपलं हटकेपण, वेगळेपण सिद्ध करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणं. प्रत्यक्ष जगातही माणसं हे करतातच पण, ऑनलाईन जगात हे अस्त्र मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. स्वतःचं वेगळेपण जगाला दाखवण्याच्या नादात सतत इतर कुणाला तरी नावं ठेवली जातात आणि हे करता करता मोठ्या प्रमाणावर राग व्यक्त केला जातो. 

सोशल मीडियावर माणसं सतत अस्वस्थ असतात. सतत रागावलेली असतात. चिडलेली असतात. कारण सतत ऑनलाईन असण्याचा जबरदस्त थकवा येऊ शकतो. आपल्याला हव्या त्या पद्धतीने तिथे गोष्टी घडल्या नाहीत तर, चिडचिड होऊ शकते आणि त्यातून येणारा राग प्रत्यक्ष आणि आभासी जगात निघायला सुरुवात होते. सतत ऑनलाईन असण्याच्या नादात मद्यपान, वेळेवर न खाणं, अति खाणं, पुरेशी झोप न होणं हे सगळे प्रकार घडतात. त्यातून एकूण शरीर स्वास्थ्य बिघडतं. परिणाम राग. अजून एक कारण म्हणजे ऑनलाईन होणाऱ्या चर्चा. यात माणसांचा पेशन्स चटकन संपतो आणि भांडाभांडी, रागराग सुरु होतो.

ऑनलाईन राग ही अतिशय कॉमन भावना आहे. कारण एकतर इथे निनावी वावरता येतं आणि नाव घेऊन वावरलं तरी लगेच कुणी दात तोडायला येणार नसतं. जी काही हाणामारी असते ती फक्त शाब्दिक असते, त्यामुळे ती काहीशी सेफ वाटते. मग, आपण अधिकच रागवायला आणि राग सतत व्यक्त करायला लागतो.  ऑनलाईन ॲन्गर मॅनेजमेंटची आज जवळपास प्रत्येकाला गरज आहे. हा विषय नवा असला तरी टाळता येण्यासारखा नाहीये. कशी करावी ऑनलाईन ॲन्गर मॅनेजमेंट. बघूया पुढच्या भागात. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया