शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भारतातला पहिला मोबाइल कॉल कोणी-कधी केला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 12:00 IST

first mobile call : पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकातातून दिल्लीत केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल कॉल केला होता.

३१ जुलै १९९५ चा तो ऐतिहासिक दिवस होता. याच दिवशी देशात पहिला मोबाईल कॉल करण्यात आला. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकातातून दिल्लीत केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल कॉल केला होता.

कोणत्या कंपनीचा मोबाईल वापरला?हा कॉल करण्यासाठी नोकियाचा हँडसेट वापरला होता, तर सुखराम यांनीही नोकियाच्याच मोबाईलचा वापर केला होता. पहिला कॉल करण्यासाठी नेटवर्क ‘मोदी टेल्स्ट्रा’चे होते, याचे नाव ‘मोबाइलनेट’ असे होते, ही नेटवर्क सेवा भारताच्या बीके मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेल्स्ट्रा यांच्यातील संयुक्त उपक्रम होता. 

न परवडणारा होता मोबाईल ‘मोदी टेल्स्ट्रा’ची नंतर स्पाइस नावाने सेवा सुरू झाली. रिपोर्ट्नुसार, सुरुवातीच्या काळात फोन कॉलचे दर आउटगोइंग आणि इनकमिंग दोन्हीसाठी रुपये ८.४ प्रति मिनिट होते; पण, सर्वाधिक मोबाईल ट्रॅफिकच्या वेळेत, प्रति मिनिट १६.८ रुपये मोजावे लागायचे. त्यावेळी मोबाईल फोन खरेदी करणेही परवडणारे नव्हते. तेव्हा साध्या मोबाईल फोनची किंमतही ४०,००० रुपयांपेक्षा जास्त असायची; पण सध्याची परिस्थिती पूर्णतः भिन्न आहे. आता गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतोच, किंबहुना मोबाईल आता लोकांची गरज बनलाय.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान