शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp ची सुरक्षा दुप्पट होणार, आता ईमेलद्वारेही तुमचं अकाऊंट चालवता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:52 IST

आता WhataApp ची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे.

WhatsApp जगभरातील अनेकजण वापरतात. व्हॉट्सअपही वापरकर्त्यांना नेहमी नवीन फिचर लाँच करत असते, आता सुरक्षेबाबत कंपनीने एक महत्वाचं अपडेट दिलं आहे. या फिचरमुळे वापरकर्त्यांना डबल सुरक्षा मिळणार आहे. यात तुम्हाला अॅप लॉगिनसाठी ईमेल व्हेरिफिकेशनचा ऑप्शनही मिळणार आहे. आतापर्यंत आपल्याला फक्त फोन नंबरनेच लॉगिन करावं लागतं होतं. पण, आता याची पद्धत बदलणार असून वापरर्त्यांसाठी आणखी एक ऑप्शन मिळणार आहे. 

१९ वर्षाच्या भारतीय मुलाने AI ब्राउझर तयार केला; सॅम ऑल्टमनने इतक्या कोटींची गुंतवणूक केली

WABetaInfo च्याअहवालानुसार, नवीन फीचर बीटा अपडेटवर जारी करण्यात आले आहे. WhatsApp च्या Android 2.23.24.10 अपडेट व्हर्जनवर पडताळणीसाठी 'ईमेल पत्ता' हा दुसरा पर्याय म्हणून जोडला आहे. सध्या हे फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. 

2.23.24.9 आणि 2.23.24.8 व्हर्जनवर काम करणाऱ्या काही लोकांना नवीन मार्गाने लॉग इन करण्याची संधीही मिळत आहे. ईमेल पडताळणी फिचरबद्दल काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अगोदर, ईमेल हा व्हॉट्सअॅप चालवण्याचा दुसरा पर्याय आहे. याचा अर्थ असा नाही की तो फोन नंबर बदलेल. व्हॉट्सअॅप खात्यांसाठी फोन नंबर हा डीफॉल्ट पडताळणी पर्याय असेल.

ईमेल पडताळणी हे एक पर्यायी फिचर असल्याने, ते वापरायचे की नाही हे वापरकर्त्यांवर आहे. तुम्ही उत्तम गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी हे फिचर वापरू शकता. फोन नंबर ही एक अतिशय खासगी गोष्ट आहे आणि  तो व्हॉट्सअ‍ॅपवर वापरताना अनेकांना त्रासाचे होते. असे काहीजण आता ईमेल पडताळणीचा वापर करून वापरकर्ता अनुभव सुधारू शकतात. 

तुम्ही WhatsApp चे बीटा व्हर्जन  चालवत असाल, तर तुम्ही ईमेल पडताळणी फिचर शोधू शकता. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. यानंतर अकाउंट ऑप्शनवर जा आणि ईमेल अॅड्रेस तपासा. जर ईमेल अॅड्रेस पर्याय दिसत असेल तर तुम्ही तुमचा ईमेल टाकून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान