शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जबरदस्त! माहिती खरी की खोटी WhatsApp सांगणार! नवं फिचर करणार लाँच, डीपफेकची तक्रारही करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 10:39 IST

सध्या व्हॉट्सअप वर अनेक अफवा पसरवल्या जात असतात. कोणतीही चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ वाढवला जातो. यावर आता मेटा कंपनीने पर्याय आणला असून WhatsApp वर एक नवीन फिचर अपडेट होणार आहे. यावर तुम्हाला आलेली माहिती खरी की खोटी हे दिसणार आहे.

WhatsApp ( Marathi News ) :WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी नव नवीन अपडेट देत असते. सध्या व्हॉट्सअप वर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. कोणतीही चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ वाढवला जातो. यावर आता मेटा कंपनीने पर्याय आणला असून WhatsApp वर आता एक नवीन फिचर अपडेट होणार आहे. यावर तुम्हाला आलेली माहिती खरी की खोटी हे दिसणार आहे. 

AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, मायक्रोसॉफ्टच्या दिग्गज अधिकाऱ्यांनी सांगितले कारण

सध्या जगभरात AI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओपन एआय सह अन्य कंपन्या यावर काम करत आहेत. काही मिनिटातच तु्म्हाला यावर माहिती मिळणार आहे. पण, याच्या काही नकारात्मक बाजुही आहेत. यामुळे लगेच चुकीची माहिती पसरली जाऊ शकते. WhatsAppव वर अशा अनेक चुकीच्या गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यामुळे समाजात तेड निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. आता यावर मेटा कंपनीने खोट्या बातम्या थांबवण्यासाठी Misinformation Combat Alliance (MCA) सोबत भागीदारी केली आहे. यासाठी, ते WhatsApp वर एक माहिती तपासणी हेल्पलाइन सुरू करणार आहे. डीपफेक आणि एआयवरुन तयार केलेली चुकीची माहिती रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकणार आहे.

ही नवीन हेल्पलाइन पुढील महिन्यात सुरू केली जाईल. याचे लाँचिंग मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे एआय जनरेटेड मीडियामधून चुकीची माहिती रोखण्यात मदत होईल. यामुळे अनेक लोकांची बदणामी होण्यापासून वाचू शकते. अनेक वेळा सायबर गुन्हेगार काही सेलिब्रिटींचे फोटो वापरतात आणि त्यांचे बनावट व्हिडीओ बनवतात.

माहिती खरी की खोटी अशी तपासा

तुम्हाला WhatsApp वर जर चुकीची माहिती आली असेल तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिला जाईल या नंबरवर संदेश पाठवायचा आहे. यानंतर काही वेळातच ती सिस्टीम आपले काम करेल आणि ती माहिती खरी आहे की खोटी हे तपासेल आणि त्याची माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवेल. 

WhatsApp ला अनेक भाषांचा सपोर्ट मिळणार 

व्हॉट्सअप वर अनेक भाषांसाठी सपोर्ट उपलब्ध असेल. व्हॉट्सॲप चॅटबॉट अनेक भाषांसाठी सपोर्टसह येईल. इंग्रजीशिवाय इतर तीन प्रादेशिक भाषांचाही सपोर्ट असेल. यावर तुम्ही एआय डीपफेकची तक्रार करू शकाल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMetaमेटाtechnologyतंत्रज्ञान