WhatsApp हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलिंग आणि ऑडिओ कॉलिंगसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. आता व्हिडीओ कॉलबद्दल बोलतांना, प्रत्येकालाच समोरच्यावर आपलं चांगलं इम्प्रेशन पाडायचं असतं.
यासाठी तुम्ही व्हिडीओ कॉलवर चांगलं दिसणं महत्त्वाचं आहे. WhatsApp वर तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात, ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडीओ कॉलिंग सुधारू शकता. यासाठी तुम्हाला WhatsApp सेटिंगमध्ये जावं लागेल. येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला Privacy वर क्लिक करावं लागेल.
येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी एक पर्याय हा कॅमेरा इफेक्टचा आहे. तुम्हाला हे फीचर चालू करावे लागेल. हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्हाला व्हिडीओ कॉलवर अनेक पर्याय मिळतील. यासाठी तुम्हाला व्हिडीओ कॉल करून पाहावं लागेल. त्यानंतर तुम्हाला बॅकग्राउंड चेंज, इफेक्ट्स आणि इतर पर्याय दिसतील.
तुम्ही तुमच्या आवडीचा इफेक्ट सेट करू शकता. हे सर्व चालू करण्यासाठी, तुम्हाला व्हिडीओ कॉल दरम्यान एक पर्याय दिसेल. तुम्हाला इफेक्ट आयकॉनवर क्लिक करावं लागेल. यामध्ये तुम्ही तुमची बॅकग्राऊंड बदलू शकता किंवा विविध फिल्टर्स आणि इफेक्ट्सचा वापर करून जास्त छान दिसू शकता.