शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Shocking! 50 कोटी युजर्सचे WhatsApp फोन नंबर Leak; पाहा तुमचाही नंबर आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 10:45 IST

WhatsApp : जवळपास 50 कोटी युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप फोन नंबर चोरीला गेले आहेत आणि ते ऑनलाइन विकले जात आहेत. 

सध्या सर्वत्र सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp) मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. व्हॉट्सअ‍ॅपवर  जवळपास 200 कोटी युजर्स आहेत. मात्र डेटा आणि प्रायव्हसीमुळे व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा अडचणीत आले आहे. एका बातमीने व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मोठा धक्का दिला आहे. जवळपास 50 कोटी युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप फोन नंबर चोरीला गेले आहेत आणि ते ऑनलाइन विकले जात आहेत. 

चोरलेले नंबर एका प्रसिद्ध हॅकिंग कम्युनिटी फोरमवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. सायबरन्यूजच्या ( CyberNews) वृत्तानुसार, डेटासेटमध्ये 84 देशांमधील व्हॉट्सअ‍ॅप युजर्स डेटा आणि यूएसमधील 32 दशलक्षाहून अधिक युजर्सचे फोन नंबर, यूकेचे 11 दशलक्ष आणि रशियाचे 10 दशलक्ष फोन नंबर सामील आहेत.

हॅकर्सनी इजिप्त (45 मिलियन), इटली (35 मिलियन), सौदी अरेबिया (29 मिलियन), फ्रान्स (20 मिलियन) आणि तुर्की (20 मिलियन) या देशांतील नागरिकांचे महत्त्वपूर्ण फोन नंबर असल्याचा दावा केला आहे. रिपोर्टनुसार, हॅकर्स यूएस डेटासेटला 7,000 डॉलर ( 5,72,481 रुपये), यूकेला 2,500 डॉलर (2,04,457 रुपये) आणि जर्मनीला 2,000 डॉलर (1,63,566 रुपये) मध्ये विकत आहे.

सायबर न्यूजच्या रिसर्चर्सनी हॅकर्सशी संपर्क साधला आहे. त्यांना हॅकर्सद्वारे एक सॅम्पल शेअर केला आहे. सॅम्पलमध्ये 1,097 यूके आणि 817 यूएसचे नंबर आहेत. रिसर्चर्सनी तपासले असता यामध्ये आढळले की, सर्व नंबर अ‍ॅक्टिव्ह युजर्सचे आहेत. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हॅकर्सनी हा डेटा कसा मिळवला हे सांगितले नाही. फक्त हॅकर्स सांगितले की, 'आपल्या रणनीतीचा वापर केला'. 

दरम्यान, सर्व नंबर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे आहेत. डेटा चोरीचा अर्थ हॅकर्स स्पॅमिंग, फिशिंग, आयडेन्टीची चोरी किंवा इतर कोणत्याही सायबर गुन्ह्यांसाठी हे नंबर वापरू शकतात. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप अनेक प्रायव्हसी सेटिंग्ज प्रोव्हाइड करते, जसे की स्टेटस लपवणे आणि प्रोफाइलचा फोटो लपवणे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान