शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भारीच! ना लास्ट सीन, ना ऑनलाईन पण ऑफलाईन राहूनही Whatsapp वर करा "असं" मजेशीर चॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 14:15 IST

WhatsApp : काही लोकांना आपण ऑनलाईन आहोत ते इतरांना समजायला नको असं वाटतं असतं. अशाच मंडळींसाठी आता एक खूशखबर आहे.

नवी दिल्ली - Whatsapp हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असून ते युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवर समोरच्या व्यक्तीला मेसेज केल्यावर आपण ऑनलाईन आहोत की ऑफलाईन याची माहिती मिळते. तसेच लास्ट सीनच्या माध्यमातून याआधी किती वाजता समोरची व्यक्ती अथवा नातेवाईक, मित्रमैत्रिणी ऑनलाईन होते याबाबत समजतं. मात्र काही लोकांना आपण ऑनलाईन आहोत ते इतरांना समजायला नको असं वाटतं असतं. अशाच मंडळींसाठी आता एक खूशखबर आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर आता ऑफलाईन राहूनही चॅटिंगची मजा घेता येणार आहे. तसेच तुम्ही ऑनलाईन आहात हे कोणाला कळणार देखील नाही. रात्री उशीरापर्यंत चॅटिंग करण्याची सवय असेल तर अशा लोकांना याचा खूप फायदा होणार आहे. अनेकदा समोरची मंडळी ऑनलाईन आहे हे पाहून विनाकारण काही लोक मेसेज करत असतात. त्यांना रिप्लाय देणं काहीवेळा कंटाळवाणं असतं. अशावेळी अशापद्धतीने ऑफलाईन राहून चॅटिंग करता येणार आहे. कसं ते जाणून घेऊया.

कोणालाच समजणार नाही तुम्ही ऑनलाईन आहात; "या" ट्रिक्स करा फॉलो

- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवरून WA bubble for chat हे अ‍ॅप डाऊनलोड करा.

- त्यानंतर अ‍ॅप अनेक अ‍ॅक्सेसिबिलिटी परमिनशन्स मागेल. त्यावर तुम्हाला allow करावे लागेल.

- आता व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले मेसेजेस तुम्हाल बबल्स मध्ये येतील.

- या चॅटिंगमध्ये तुम्ही कोणालाही ऑनलाईन दिसणार नाही. तसेच ऑफलाईन राहून आरामात सहज चॅटिंग करू शकता.

- यासोबतच यामध्ये कोणालाही तुमचा लास्ट सीन दिसणार नाही.

WhatsApp OTP Scam म्हणजे नेमकं काय?, जाणून घ्या कसा करायचा फ्रॉडपासून बचाव

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र सध्या हे हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित नवनवीन फ्रॉड केले जात आहेत. सध्या एका नव्या प्रकारचा स्कॅम हा व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने एखादा मित्रचं आपलं अकाऊंट हॅक करू शकतो. WhatsApp OTP स्कॅम म्हणजे नेमकं काय? आणि यापासून कसा बचाव करायचा हे जाणून घेऊया. व्हॉट्सअ‍ॅप ओटीपी स्कॅममध्ये स्कॅमर सर्वप्रथम युजर्सना त्याच्याच एका मित्राच्या नावाने मेसेज पाठवतात. तसेच तुमचा मित्र अडचणीत असल्याचं त्यामध्ये सांगितलं जातं. अनेकदा हॅकर्स मित्रांच्या नंबरवरूनच मेसेज करतात. 

हॅकर्सच्या जाळ्यात अडकून मेसेजला रिप्लाय केल्यास हॅकर्सकडून आणखी एक मेसेज पाठवला जातो. त्यानंतर ओटीपी विचारला जाईल. चुकून हा मेसेज तुम्हाला पाठवला असं सांगून हॅकर तोच मेसेच पुन्हा त्याला फॉरवर्ड करायला सांगेल. मात्र यामागचं खरं कारण म्हणजे हे मुद्दाम ओटीपीच्या माध्यमातून युजर्सचं अकाऊंट हॅक करण्यासाठी करण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्सनी सावध राहणं गरजेचं आहे. ओटीपी सांगितल्यास तुमच्या नंबरच्या मदतीने हॅकरच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू होईल. कारण व्हॉट्सअ‍ॅप नव्या डिव्हाईसमध्ये सुरू करण्यासाठी फक्त एका ओटीपीची गरज असते. तो हॅकरने युजर्सकडून मागितलेला असतो. याचाच गैरफायदा घेऊन हॅकर्स आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून पैसे मागू शकतात अथवा त्यांना ब्लॅकमेल करण्यासारखे फ्रॉड करतात. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान