नवी दिल्ली - इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्य़ा युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर आणत असतं. असंच एक धमाकेदार फीचर पुन्हा एकदा आणलं आहे. Voice Messages साठी खास फीचर आणलं असून या फीचरद्वारे वॉइस प्रीव्ह्यूचा पर्याय मिळेल. युजर्स WhatsApp वर वॉइस मेसेज सेंड करण्याआधी ऐकू शकतील. यामुळे योग्य वॉइस मेसेज पाठवण्यासाठी मदत मिळेल. WhatsApp चे वॉइस मेसेजेस फीचर लोकप्रिय आहे. यामुळे वॉइस मेसेज करण्याची व ऐकण्याची सुविधा मिळते.
WhatsApp वर वॉइस मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर आतापर्यंत पुन्हा ऐकता येत नव्हतं. पण आता नवीन फीचरमुळे वॉइस मेसेज पाठवण्याआधी युजर्सला ऐकता येणार आहे. यासाठी तुम्हाला WhatsApp वर एखादा व्यक्ती किंवा ग्रुप चॅट ओपन करावे लागेल. चॅट ओपन केल्यानंतर मायक्रोफोनवर टच करा आणि स्लाइड अप करून हँड्स-फ्री रेकॉर्डिंगला लॉक करा. त्यानंतर तुम्ही वॉइस रेकॉर्ड करू शकता. बोलणे पूर्ण झाल्यानंतर स्टॉपवर टॅप करा.
प्लेवर टॅप करून आता तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. युजर्स टाइम स्टँपद्वारे रेकॉर्डिंगच्या कोणताही भाग ऐकू शकतील. रेकॉर्डिंग न आवडल्यास ट्रॅशवर टॅप करून वॉइस मेसेजला डिलीट करता येईल. जर तुम्हाला वॉइस मेसेज योग्य वाटत असल्यास सेंडवर क्लिक करून इतर युजर्सला पाठवू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मेसेज करण्यासाठी आपण सर्वचजण आधी मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करत असतो. मात्र, तुम्ही नंबर न सेव्ह करता देखील सहज WhatsApp च्या माध्यमातून मेसेज करू शकता. कसं ते जाणून घेऊया...
नंबर सेव्ह न करता असा करू शकता WhatsApp मेसेज
- सर्वाप्रथम फोनवर वेब ब्राऊजर ओपन करा.
- त्यानंतर http://api.whatsapp.com/send?phone=xxxxxxxxxx या लिंकला एड्रेस बारमध्ये पेस्ट करा.
- xxxxxxxxxx च्या जागी कंट्री कोड टाकून कॉन्टॅक्ट नंबर एंटर करा.
- आता फोनमध्ये एंटर बटणवर क्लिक करा.
- त्यानंतर फोनच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल. ज्यावर हिरव्या रंगाचे मेसेज बटण दिसेल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट व्हॉट्सअॅप ओपन होईल.
- येथून तुम्ही नंबर सेव्ह नसलेल्या व्यक्तीला थेट मेसेज करू शकता.