शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

WhatsApp चे ५ दमदार फीचर्स; कलरफुल थीमसह व्हिडीओ प्लेबॅक स्पीड सेट करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:09 IST

WhatsApp : प्रायव्हसी आणि सिक्योरिटी आणखी चांगली होण्यासाठी WhatsApp मध्ये वेळोवेळी बदल केले जातात.

प्रायव्हसी आणि सिक्योरिटी आणखी चांगली होण्यासाठी WhatsApp मध्ये वेळोवेळी बदल केले जातात. याशिवाय, त्यात नवीन फीचर्स देखील जोडले जातात.  प्लॅटफॉर्म प्रायव्हसी, सिक्योरिटी आणि कस्टमायझेशन मजबूत करण्यासाठी सतत स्वतःला अपडेट करत आहे. आता कंपनीने ५ नवीन दमदार फीचर्स आणण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे मेसेजिंग आणखी सोयीस्कर होईल. व्हिडीओ प्लेबॅक सुधारण्यासाठी देखील हे फीचर्स खूप उपयुक्त ठरतील.

 कलरफुल थीम्सने चॅट करा कस्टमाइझ

आता WhatsApp युजर्स त्यांचे चॅटिंग आणखी पर्सनलाइज करू शकतात. पूर्वी, युजर्सकडे कमी पर्याय होते. आता WhatsApp ने २० नवीन व्हायब्रंट चॅट थीम आणि ३० नवीन वॉलपेपर जोडले आहेत. या फीचरच्या मदतीने, युजर्स त्यांच्या आवडीनुसार रंग सेट करू शकतात, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव नवीन आणि फ्रेश वाटेल.

क्लियर चॅट नोटिफिकेशन्सपासून मिळेल आराम

आता नोटिफिकेशन कस्टमाइझ करण्याचा पर्याय देखील दिला जात आहे. अनेक युजर्सना अनरीड मेसेजचं नोटिफिकेशन डॉट त्रास देतो. विशेषतः जेव्हा एकाच वेळी अनेक मेसेज येतात. आता WhatsApp ने क्लिअर चॅट नोटिफिकेशन्स फीचर सादर केलं आहे, ज्याद्वारे युजर्स स्वतः नोटिफिकेशन्स कशा दिसाव्यात हे ठरवू शकतील. याव्यतिरिक्त, तुम्हाला नको असेलल्या नोटिफिकेशन्स काढून टाकण्याचा पर्याय मिळेल. 

 Meta AI विजेटने AI चॅटबॉटचा इन्स्टेंट एक्सेस

WhatsApp आता एआय फीचर्स इंटीग्रेट करत आहे. युजर्स त्यांच्या होम स्क्रीनवर मेटा एआय विजेट जोडू शकतात, ज्यामुळे एआय चॅटबॉटमध्ये  इन्स्टेंट एक्सेस मिळतो. हे फीचर चालू करण्यासाठी, युजर्सना Personalization > Widgets सेक्शनमध्ये जावं लागेल आणि नंतर त्यांच्या फोनच्या होम स्क्रीनवर मेटा एआय विजेट जोडावे लागेल. यानंतर, फक्त एका टॅपने एआय चॅटबॉट उघडेल आणि युजर्सना मदत करेल.

व्हिडीओ प्लेबॅक स्पीड करा एडजस्ट

WhatsApp कडे आता व्हिडीओ प्लेबॅकचा स्पीड बदलण्याचा पर्याय आहे. पूर्वी हे फीचर फक्त व्हॉइस नोट्ससाठी उपलब्ध होतं, परंतु आता युजर्स १.५x किंवा २x वेगाने व्हिडीओ देखील पाहू शकतात. हे फीचर विशेषतः मोठा व्हिडीओ लवकर पाहण्यासाठी उपयुक्त ठरेल.

अनरीड चॅट काउंटर आता चॅट फिल्टरमध्ये देखील उपलब्ध

WhatsApp ने गेल्या वर्षी चॅट फिल्टर फीचर सादर केले होते, जे मेसेजेस चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करण्यास मदत करते. आता त्यात एक नवीन अनरीड चॅट काउंटर जोडले गेलं आहे. या फीचरच्या मदतीने, युजर्सना चॅट फिल्टरमध्ये किती अनरीड मेसेज आहेत हे थेट कळेल, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा मेसेज चुकणार नाही.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान