शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

WhatsApp Private Reply : प्रायव्हेट रिप्लाय फीचर काय आहे? अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबवर कसे वापरायचे, ते जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 18:02 IST

WhatsApp Private Reply : प्रायव्हेट रिप्लाय फीचरद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीसोबत प्रायव्हेट चॅट करू शकता.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स (WhatsApp Groups) हा मित्र आणि कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा एक सोयीचा मार्ग आहे. गेल्या काही महिन्यांत, व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अ‍ॅपमध्ये काही मजेदार नवीन फीचर्स जोडले आहेत. यामध्ये 2GB पर्यंत फाईल शेअरिंग, अॅडमिन कंट्रोल, ग्रुप कॉल्स, डिसपिअरिंग मेसेजेस यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. बर्‍याच वेळा असे होते की, जेव्हा युजर एखाद्या ग्रुपमध्ये मेसेज पाठवतो, तेव्हा त्या मेसेजला प्रायव्हेट रिप्लाय (Private Reply) द्यायचा असतो. यासाठी प्रायव्हेट रिप्लाय हे फीचर खूप उपयुक्त आहे.

प्रायव्हेट रिप्लाय फीचरद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीसोबत प्रायव्हेट चॅट करू शकता. अनेकवेळा आपण व्हॉट्सअ‍ॅप वरील मेसेजला रिप्लाय देतो, तेव्हा त्या ग्रुपमधील बाकीच्या युजर्सना अडचण होते. पण जर तुम्ही प्रायव्हेट रिप्लाय फीचर वापरत असाल तर तुमचे चॅट सुद्धा होईल आणि बाकीच्यांना कोणतीही अडचण येणार नाही. हे फीचर Android, iOS आणि WhatsApp वेब/डेस्कटॉप अ‍ॅपवर उपलब्ध आहे. 

How to Reply to Private Messages on WhatsApp on Phone?- सर्वात आधी तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करा.- त्यानंतर ग्रुप चॅटवर जा.- आता ज्या मेसेजवर तुम्हाला प्रायव्हेट रिप्लाय द्यायचा आहे, त्यावर टॅप करा आणि धरून ठेवा.- आता वरच्या उजव्या कोपऱ्यात मेनू बटणावर टॅप करा.- त्यानंतर Reply Privately वर निवडा.- आता पर्सनल चॅट दरम्यान ज्या मेसेजला तुम्ही सिलेक्ट केले आहे, तो आपोआप कोट होईल.- आता नवीन प्रायव्हेट चॅट स्क्रीनवर मेसेज टाइप करा आणि पाठवा.

How to Reply to Private Messages on WhatsApp on WhatsApp Web?- आता तुमच्या कॅम्प्युटरवर WhatsApp Web/Desktop app उघडा.- आता ग्रुप चॅट वर जा.-  यानंतर कोणताही मेसेज किंवा मीडियाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर क्लिक करा.- त्यानंतर Reply privately वर क्लिक करा.- आता तुम्ही सिलेक्ट केलेला मेसेज पर्सनल चॅटमध्ये आपोआप दिसेल.-  नवीन प्रायव्हेट चॅट स्क्रीनवर मेसेज टाइप करा आणि पाठवा.

तुम्ही कोणताही टेक्स्ट, मेसेज किंवा व्हिडिओ मेसेजवर टॅप करून प्रायव्हेट रिप्लाय देऊ शकता. स्क्रीन शॉटवरून स्पष्ट झाल्याप्रमाणे, प्रायव्हेट रिप्लाय फीचरमध्ये ग्रुपमधून मेसेज कोट होते. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान