इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत एकापेक्षा एक चांगले फीचर आणत असतं. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दररोज नवीन अपडेट्स येतात. अनेक फीचरसाठी बीटा टेस्टिंग देखील सुरू आहे. ग्रुप व्हिडीओ कॉल आणि मेटा एआय नंतर, WhatsAppआता एक असं फीचर आणण्याची तयारी करत आहे जे तुम्हाला काही मिनिटांत अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करण्यास मदत करेल. या नवीन अपडेटनंतर, युजर्सना वेगवेगळ्या एप्सवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
जर तुम्ही दरमहा वीज, पाणी आणि इतर बिल भरण्यासाठी वेगवेगळ्या अॅप्सचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच WhatsApp एक नवीन अद्भुत फीचर आणणार आहे, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या तुमचं पाणी आणि वीज बिल WhatsApp द्वारेच भरू शकता.
WhatsApp च्या या नवीन फीचरचं टेस्टिंग सुरू आहे आणि लवकरच ते सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल. जर तुम्हीही WhatsApp वापरत असाल तर हे अपडेट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. हे फिचर आल्यानंतर डिजिटल पेमेंट आणखी सोपं आणि जलद होऊ शकतं.
रिपोर्ट्सनुसार, WhatsApp लवकरच यूपीआय-आधारित बिल पेमेंट सिस्टम लाँच करणार आहे, ज्याद्वारे युजर्स वीज, पाणी, मोबाईल रिचार्ज, भाडं भरणं अशी अनेक कामं थेट WhatsApp द्वारे करू शकतील. सध्या WhatsApp पे फक्त यूपीआय व्यवहारांसाठी उपलब्ध आहे, परंतु हे फीचर आल्यानंतर त्याची व्याप्ती आणखी वाढेल.
WhatsApp च्या या नवीन फीचरमुळे युजर्सना कोणते फायदे मिळतील?
एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व पेमेंट
आता पाणी, वीज, मोबाईल रिचार्ज यांसारखी महत्त्वाची बिलं WhatsApp वर भरता येतील.
UPI इंटीग्रेशन
WhatsApp Pay आणि चांगलं बनवूनकोणत्याही थर्ड पार्टी एप्सशिवाय त्याचा वापर करता येणार आहे.
जलद व्यवहार
कोणत्याही अतिरिक्त एपशिवाय चॅटद्वारे थेट पेमेंट करता येतं.
सुरक्षित आणि विश्वासार्ह
NPCI द्वारे मान्यताप्राप्त, WhatsApp Pay आधीच सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड आहे, त्यामुळे युजर्सना सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची गरज नाही.