सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप (WhatsApp) सध्या सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपचे अनेक युजर्स आहेत. अशा परिस्थितीत युजर्सच्या सोयीसाठी कंपनी या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर्स अॅड करत असते. व्हॉट्सअॅप आता अशा एका फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे कोणत्याही भाषेत संवाद साधणे सोपे होणार आहे.
कंपनी व्हॉट्सअॅपमधील भाषांतर (ट्रान्सलेशन) प्रक्रिया सुधारण्यावर काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार, हे फीचर आपोआप भाषा ओळखेल आणि भाषांतर करेल. यासाठी युजर्स कोणत्या भाषेत मेसेज आला आहे, हे आधी सांगण्याची आवश्यकता राहणार नाही. हे फीचर आल्यानंतर युजर्सना वेगवेगळ्या भाषांमध्ये चॅट करणे सोपे होईल.
हे डाउनलोड करण्यायोग्य लँग्वेज पॅक्सच्या मदतीने काम करेल. कंपनीचे म्हणणे आहे की, संभाषणादरम्यान, कोणताही डेटा कोणत्याही एक्सटर्नल सोर्सवर पाठवला जाणार नाही. ज्यामुळे युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल. यासोबतच, हे फीचर ऑफलाइन काम करेल आणि मेसेज ट्रान्सलेशनसाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही.
विशेषतः हे नवीन फीचर ग्रुप चॅटमध्ये उपयुक्त ठरू शकेल. जिथे लोक विविध भाषांमध्ये चॅट करतात. हे फीचर प्रत्येक मेसेजची भाषा ओळखेल आणि ते ऑटोमेटिक ट्रान्सलेट करेल. सध्या, कंपनी या फीचरवर काम करत आहे. सुरूवातीला हे फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी आणले जाईल.
WhatsApp स्टेटसमध्ये येणार नवीन Creation टूल्सव्हॉट्सअॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी आणखी एक फीचर आणणार आहे. कंपनी स्टेटस सेक्शनसाठी एक नवीन क्रिएशन टूल आणणार आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप युजर्सना लवकरच त्यांच्या स्टेटसमध्ये अनेक नवीन टूल्स मिळणार आहेत. Wabetainfo च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp beta for Android 2.25.3.2 व्हर्जनमध्ये आगामी क्रिएशन टूल्स स्पॉट करण्यात आले आहे. या नवीन फीचरचा स्क्रीनशॉट Wabetainfo ने देखील शेअर केला आहे.