शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Stickerनंतर आता WhatsAppवर येणार इन्स्टाग्रामसारखं नवं फीचर, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 21:02 IST

WhatsApp म्हणजे जीवनाचा आता एक अविभाज्य भाग झालंय. सकाळीच उठल्या उठल्या पहिल्यांदा व्हॉट्सअॅप पाहिलं जातं.

नवी दिल्ली- WhatsApp म्हणजे जीवनाचा आता एक अविभाज्य भाग झालंय. सकाळीच उठल्या उठल्या पहिल्यांदा व्हॉट्सअॅप पाहिलं जातं. त्यामुळे व्हॉट्सअॅप अल्पावधीतच वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय झालं आहे. तसेच व्हॉट्सअॅप नवनवे फीचर उपलब्ध करून देत असल्यानं यूझर्सच्याही पसंतीस उतरत आहे. व्हॉट्सअॅपनं हल्लीच Sticker हे फीचर आणलं असून, व्हॉट्सअॅप आता वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामसारखं फीचर उपलब्ध करून देणार आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना कॉन्टॅक्ट अॅड करण्यास मदत होणार आहे.या फीचरचं नाव "Share Contact Info via QR" असणार आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही QR कोड स्कॅन करून दुसरे कॉन्टॅक्ट अॅड करू शकणार आहात. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर एकदम इन्स्टाग्राममधल्या Nametag फीचरसारखं आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्ते या युनिक QR कोडच्या माध्यमातून एकमेकांना अॅड करू शकतील. WaBetaInfoनुसार, QR कोडमुळे व्हॉट्सअॅपला स्वतःला कॉन्टॅक्ट यादीच्या स्वरूपात घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच Sticker हे फीचर वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आलं होतं. आता हे नवं फीचर आणून व्हॉट्सअॅपनं तंत्रज्ञानाच्या जगतात धुमाकूळ घातला आहे.WhatsAppनं 2018च्या सुरुवातीपासूनच यूजर्ससाठी नवनवे फीचर्स ग्राहकांच्या सेवेत आणण्याचा धडाका लावला आहे. आता एक पाऊल पुढे टाकत WhatsApp आणखी पाच फीचर्स ग्राहकांसाठी आणणार आहे. सध्या तरी हे फीचर्स बिटा वर्जनमध्ये देण्यात आले आहेत. तसेच लवकरच व्हॉट्सअॅपकडून ग्राहकांसाठी नवे अपडेट्स येण्याची चिन्हे आहेत. या फीचर्समध्ये प्रायव्हेट रिप्लाय, व्हेकेशन मोड, लिंक्ड सोशल मीडिया अकाऊंट्स, इनलाइन इमेज आणि सायलेंड मोडचा समावेश आहे. कंपनीनं स्टिकर फीचर उपलब्ध करून दिल्यानंतर प्रायव्हेट रिप्लाय फीचरची सुविधा ग्राहकांसाठी आणली आहे. या फीचर्सच्या माध्यमातून ग्रुप चॅटमध्येही तुम्ही प्रायव्हेट रिप्लाय करू शकता. या फीचरच्या मदतीनं ग्रुप चॅटमध्येही कोणत्याही अडचणीविना एक युजर्स दुस-या युजर्सशी चाट करू शकतो. व्हॉट्सअॅप ग्रुपवरचे मेसेज पाहण्यासाठी तीन डॉटवर क्लिक करून प्रायव्हेट रिप्लाय ऑप्शन वापरू शकता. सध्या तरी हे फीचर बिटा वर्जनमध्ये उपलब्ध आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप