शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी नंबरवरून मेसेज आला, तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 08:04 IST

परदेशातून येणारे फ्रॉड कॉल्स हा एक धोकादायक प्रकार आहे. याबाबतीत आपण काळजीपूर्वक रहावे, असा इशारा पोलीस आणि मोबाइल कंपन्या आपल्याला वारंवार देत असतात.

मला रविवारी रात्री पाकिस्तानातल्या एका नंबरवरून मेसेज आला आहे. मी विनाकारण एखाद्या भानगडीत सापडण्याची शक्यता नाही ना?  मी काय करू शकते?- एक वाचकपरदेशातून येणारे फ्रॉड कॉल्स हा एक धोकादायक प्रकार आहे. याबाबतीत आपण काळजीपूर्वक रहावे, असा इशारा पोलीस आणि मोबाइल कंपन्या आपल्याला वारंवार देत असतात. फोन बरोबरच वापरकर्त्यानीदेखील स्मार्ट होणे अपेक्षित आहे.

अशा कॉल्सना किंवा मेसेजेसना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देऊ नये. व्हॉट्सॲप सारख्या  ॲपवरून थेट व्हॉइस कॉल करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने अशा कॉल्सची शक्यता वाढली आहे. संगणकीय युक्त्या वापरून स्वतःची खोटी ओळख निर्माण करणे आणि आपण केलेले कॉल्स दुसऱ्या देशांमधून केल्यासारखे भासवणे शक्य होत असते. भ्रामक व्हर्च्युअल जगात आपल्याला एखादी गोष्ट जशी दिसते आहे तशीच ती असते, असे नाही.  फोन करून पैसे लुटण्यासाठी आमिष दाखवले जाते. कॉल खोडसाळ आहे की खरा आहे, हे ओळखण्यासाठी कोणतीही निर्दोष प्रणाली उपलब्ध नाही.

संशयास्पद कॉल्सना कधीही कॉलबॅक करू नये.  ते नंबर्स तातडीने ब्लॉक करावे.  ब्लॉकसोबतच व्हॉट्सॲपने रिपोर्ट फीचरही जारी केले आहे. व्हॉट्सॲपवर  ९२ कोडसह पाकिस्तानी नंबरची तक्रार करा. त्याचा अहवाल दिल्यास त्या नंबरवर बेकायदेशीर कृत्य झाल्याचे व्हॉट्सॲपला कळेल आणि व्हॉट्सॲप त्या नंबरची चौकशी सुरू करेल. याखेरीज एक सजग भारतीय म्हणून ही घटना व्हॉट्सॲपवर ईमेलद्वारे पोहोचवणे आवश्यक आहे. व्हॉट्सॲपच्या वेबसाईटवर जाऊन त्याची माहिती द्या. त्यामुळे इतर लोकांचा धोका कमी होइल.

पोलीस यंत्रणेनेदेखील सायबर सुरक्षेसाठी विशेष कक्ष चालविलेले आहेत. आपल्या विभागाच्या पोलीस यंत्रणेने अशा तक्रारी करण्यासाठी विशेष ऑनलाइन लिंक्स तयार केलेल्या आहेत. आपण तत्परतेने अशा विशेष कक्षांकडे तक्रार केली पाहिजे. https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावरदेखील आपण अशा तक्रारी दाखल करू शकाल.

दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते  तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com

टॅग्स :MobileमोबाइलPakistanपाकिस्तान