शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

iPhone च्या नावातील ‘i’ चा अर्थ तरी काय?

By सिद्धेश जाधव | Published: January 19, 2022 6:44 PM

iPhone च्या नावातील ‘i’ चे अर्थ अनेक आहेत.

जरी तुमच्याकडे iPhone नसला तरी तुमच्या आजूबाजूला आयफोन वापरणारे असतील. तुम्ही लोकमतच्या टेक सेगमेंटमधील लेख वाचत आहात म्हणजे तुम्ही आयफोन विषयी इथे देखील वाचलं असेलच. 2007 मध्ये पहिला आयफोन बाजारात आला होता. या क्रांतिकारी स्मार्टफोननं मोबाईलचं विश्वच बदलून टाकलं. अनेक भारतीयांसाठी ‘ड्रीम फोन’ असणाऱ्या आयफोनच्या नावातील ‘i’ चा फुलफॉर्म तरी काय?  

तुम्ही कुठे ना कुठे तरी वाचलं असेल कि या अक्षराचा फुलफॉर्म “Internet” आहे. कारण पहिल्या आयफोननं मोबाईलवर इंटरनेट अ‍ॅक्सेसला प्रसिद्धी दिली होती. किंवा हा फोन मोठ्या प्रमाणावर पर्सनलाईज करता येतो म्हणून सर्वनाम म्हणून “I” वापरण्यात आला आहे. खरं तर या छोट्या अक्षराचे पाच अर्थ आहेत.  

आयफोन अस्तित्वात येण्याआधीपासूनच अ‍ॅप्पल प्रोडक्ट्समध्ये “I” चा वापर केला जात होता. 1998 मध्ये आलेला iMac कंप्यूटर त्याचाच उदाहरण. तेव्हा कंप्युटर्समध्ये देखील इंटरनेट नव्हतं. त्यामुळे “I” मॅकमधील इंटरनेट क्षमता दर्शवत होता.  

परंतु जेव्हा पहिला iMac लाँच झाला होता तेव्हा “I” चे अनेक अर्थ होते. जेव्हा स्टीव्ह जॉब्स यांनी iMac जगासमोर ठेवला होता तेव्हा प्रेझेन्टेशनमध्ये पाच शब्द दिले होते. त्या प्रेझेन्टेशननुसार ‘I’ म्हणजे internet, individual, instruct, inform आणि inspire. परंतु असे जरी असले तरी या अक्षराचा अधिकृत असा कोणताही अर्थ नाही, असं Comparitech चे पॉल बिशप सांगतात. या अक्षराचे अनेक अर्थ काढता येतात, असं देखील ते म्हणतात.  

जरी “I” म्हणजे “Internet” अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यामागे 2007 मध्ये आलेल्या आयफोन मधील इंटरनेट अ‍ॅक्सेसचं योगदान आहे. परंतु त्यानंतर आलेल्या आणि इंटरनेट नसलेल्या प्रोडक्ट्सचं नाव देखील I ने सुरु झाले होते. ज्यात सुरुवातीच्या iPod चा समावेश आहे. जरी या आयकॉनिक “I” चा अधिकृत असा अर्थ नसला तरी या छोट्याश्या अक्षराने ब्रँड ओळख दिली आहे, एवढं मात्र नक्की.  

हे देखील वाचा:

तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट

आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट! iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट देतंय तगडी सूट; अशी आहे ऑफर

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान