शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! सोनू सूद देणार तब्बल 1 लाख लोकांना नोकऱ्या; जाणून घ्या, कसा आणि कुठे करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 12:03 IST

Sonu Sood will give job to 1 lakh people : सोनू बेरोजगारांच्या मदतीला धावून आला असून त्यांच्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलणार आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. आताही तो कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. यावेळी सोनू बेरोजगारांच्या मदतीला धावून आला असून त्यांच्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलणार आहे.   Sonu Sood will give job to 1 lakh people

सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा एक महत्त्वकांक्षी प्लॅन लोकांसोबत शेअर केला आहे. तो आता एक लाख लोकांना नोकरी देण्यासाठी एक प्लॅन आखत आहे. त्याच्या या ट्वीटमुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. "नवीन वर्ष.... नवीन स्वप्नं... नवीन नोकरीच्या संधी... आणि आम्ही आता तुम्हाला नोकरीची संधी देणार आहोत... गुडवर्कर हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि तुमचे भविष्य उज्जवल करा..." असं सोनूने ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोनूने या अ‍ॅप्लिकेशनला डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक दिली आहे. या अ‍ॅपद्वारे 10 कोटी लोकांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नोकरी शोधणारे युवक सोनूचे हे ट्वीट पाहून प्रचंड खूश झाले आहेत. सोनूच्या या प्रयत्नसाठी अनेकांनी सोशल मीडियाद्वारे सोनूचे आभार मानले आहेत. 

काय आहे गुडवर्कर अ‍ॅप?

- गुडवर्कर अ‍ॅप हे एक नोकरी (Job) मिळवण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्लिकेशन आहे. 

- देशातील प्रवासी मजुरांना नोकरी मिळवून देण्यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 

- बेरोजगार असलेले आणि नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी हे अ‍ॅप आहे. 

- लाखो लोकांना जॉब लिंकेज आणि करिअरसाठी मदत करणं हा गुडवर्कर अ‍ॅपचा मुख्य उद्देश आहे. 

- हे अ‍ॅप अत्यंत सुरक्षित असून, त्यात कोणतीही फसवणूक होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

गुडवर्कर अ‍ॅप कसं काम करतं. 

- नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना आता घरबसल्या नोकरी शोधता येणार आहे. 

- गुडवर्कर हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी http://bit.ly/GoodWorkerApp वर क्लिक करा आणि ते डाऊनलोड करा.

- या अ‍ॅपवर युजर्सना मोफत आपला बायोडेटा तयार आणि शेअर करता येणार आहे. आपल्या भाषेत बायोडेटा तयार केला नंतर त्याचं इंग्रजी भाषेत भाषांतर केलं जाईल. नंतर तो तो कंपन्यांकडे पाठवला जाणार आहे

- जॉब मॅचिंग टूलच्या माध्यमातून योग्य नोकरीची माहिती अर्ज करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

- तुम्ही ज्या गावात तुम्ही राहात असाल किंवा जिथं नोकरीच्या शोधात असाल त्या ठिकाणच्या नोकऱ्यांबाबत माहिती दिली जाईल.

- एखाद्या कंपनीत नवीन कामगार भरती होत असेल तर त्याची माहिती हे अ‍ॅप देईल. तुमचं राहण्याचं ठिकाण आणि पात्रता यानुसार योग्य नोकऱ्यांची माहिती दिली जाईल.

- एखाद्या ठिकाणी तुमची निवड झाली तर तिथल्या मुलाखतीबाबत सर्व माहिती म्हणजे मुलाखत कधी, कुठे, किती वाजता, पगार, कंपनीच्या संबधित अधिकाऱ्याचा फोन नंबर, ईमेल आयडी अशा सर्व गोष्टींची माहिती दिली जाईल.

- गुडवर्कर अ‍ॅपवरून तुम्हाला नोकरी मिळाली तर कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र दिलं जाईल. ज्यामुळं दुसऱ्या ठिकाणी काम मिळणं सोपं जाईल. हे अ‍ॅप ही सर्व सेवा मोफत देत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूद