शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

काय ! स्मार्टफोन चा पॅटर्न लॉक विसरलात ?

By अनिल भापकर | Updated: December 29, 2017 15:55 IST

सध्याच्या काळात स्मार्टफोन ने पर्सनल कॉम्पुटरची जागा घेतली. त्यामुळे स्मार्टफोन ला आता पर्सनल स्मार्टफोन अर्थात (पी एस )असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .याला कारणही तसेच आहे तुमच्या घरात जेवढी माणसं तेवढे स्मार्टफोन. प्रत्येकाचा आपला पर्सनल स्मार्टफोन म्हणजेच पी एस . म्हणजे घरात नियम एवढे कडक कि एका ने दुसऱ्याच्या पर्सनल स्मार्टफोन ला हात लावायचा नाही . प्रत्येक जण आपला स्मार्टफोन अधिकाधिक पर्सनल कसा राहील याची काळजी घेत राहतो .अगदी नवरा बायको सुद्धा एकमेकांचे स्मार्टफोन चे पासवर्ड सांगत नाही.मग जर तुम्ही पॅटर्न लॉक विसरला तर काय कराल?

ठळक मुद्देसध्याच्या काळात स्मार्टफोन ने पर्सनल कॉम्पुटरची जागा घेतली. त्यामुळे स्मार्टफोन ला आता पर्सनल स्मार्टफोन अर्थात (पी एस )असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .याला कारणही तसेच आहे तुमच्या घरात जेवढी माणसं तेवढे स्मार्टफोन. प्रत्येकाचा आपला पर्सनल स्मार्टफोन म्हणपॅटर्न लॉक उघडता येत नाही, म्हणून रडत बसायची पाळी येते.तशी तुमच्यावर येऊ नये, म्हणून या काही सोप्या आयडिया लक्षात ठेवा..

 

सध्याच्या काळात स्मार्टफोन ने पर्सनल कॉम्पुटरची जागा घेतली. त्यामुळे स्मार्टफोन ला आता पर्सनल स्मार्टफोन अर्थात (पी एस )असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .याला कारणही तसेच आहे तुमच्या घरात जेवढी माणसं तेवढे स्मार्टफोन. प्रत्येकाचा आपला पर्सनल स्मार्टफोन म्हणजेच पी एस . म्हणजे घरात नियम एवढे कडक कि एका ने दुसऱ्याच्या पर्सनल स्मार्टफोन ला हात लावायचा नाही . प्रत्येक जण आपला स्मार्टफोन अधिकाधिक पर्सनल कसा राहील याची काळजी घेत राहतो .अगदी नवरा बायको सुद्धा एकमेकांचे स्मार्टफोन चे पासवर्ड सांगत नाही. प्रत्येक जण आपल्या पर्सनल स्मार्टफोन म्हणजेच पी एस ला पासवर्ड देऊन ठेवतो.स्मार्टफोन ला पासवर्ड ठेवण्याचा सगळ्यात सर्रास वापरला जाणारा प्रकार म्हणजे पॅटर्न लॉक . पण खरी गंमत तर तेव्हा होते जेव्हा तुम्ही पर्सनल स्मार्टफोन चा पॅटर्न लॉक विसरता.  कारण तुम्ही तुमच्या पीएस चा पॅटर्न लॉक इतर कुणाला सांगितलेला सुद्धा नसतो . मग जर तुम्ही पॅटर्न लॉक विसरला तर काय कराल? या जागतिक प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा शोधण्याचा हा केलेला  छोटासा  प्रयत्न  .

स्मार्टफोनमध्ये जे काही बिल्टइन सिक्युरिटी फिचर असतात त्यातले सगळ्यात जास्त वापरले जाणारे सिक्युरिटी फिचर म्हणजे पॅटर्न लॉक ! स्मार्टफोन सिक्युरिटीमधला सगळ्यात वरचा लेअर म्हणजे हा ‘पॅटर्न लॉक ’.

स्मार्टफोन विकत घेतला रे घेतला की, सगळ्यात आधी लोक हा पॅटर्न लॉक सेट करतात, तो सतत बदलतात. इतरांपेक्षा आपला लॉक वेगळा असावा, म्हणून धडपडतात. पॅटर्न लॉक बदलत राहणं हा अनेकांचा छंदच होऊन बसलेला असतो.हे गाडं तिथवर सुरळीत राहतं, जोवर तुमची स्मरणशक्ती तुम्हाला दगा देत नाही.पण ती कधीतरी दगा देतेच. आणि मग या नात्यामध्ये दरार  पडते. स्वत:च सेट केलेले पॅटर्न काहीजण विसरून जातात.मग होते खरी पंचाईत. कारण पॅटर्न लॉक विसरलं तर स्मार्टफोन कसं वापरणार ? ते लॉक ‘अनलॉक’ करावं लागतं आणि जिथं ऐनवेळेस आपला नेहमीचा पॅटर्न आठवत नाही, तिथं अनलॉक करायचं कसं आठवावं?

पण ते माहिती तर पाहिजे, नाहीतर पॅटर्न लॉक उघडता येत नाही, म्हणून रडत बसायची पाळी येते.तशी तुमच्यावर येऊ नये, म्हणून या काही सोप्या आयडिया लक्षात ठेवा..

पॅटर्न लॉक अनलॉक कसं करतात ?

पद्धत -1

गुगलचं युजरनेम पासवर्ड

जर तुम्ही तुमचा पॅटर्न लॉक  विसरलात तर ते अनलॉक  करण्याची ही एक सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. तुम्ही पाचवेळा प्रयत्न करुनही  अनलॉक  होत नसेल तर खाली फरगॉट पॅटर्न हा एक ऑप्शन असतो तो पहा. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला गुगल अकाऊंचं युजर नेम आणि पासवर्ड विचारला जातो. आजकाल जवळपास नव्वद टक्के स्मार्टफोन धारकांकडे गुगल अकऊंटचं युजर नेम आणि पासवर्ड म्हणजेच गुगलचं अकाऊंट असतंच. त्यामुळे हे गुगल अकऊंटचं युजर नेम आणि  पासवर्ड टाकला की काम झालं. त्यानंतर मुळ स्वरुपात म्हणजेच स्क्रिन ओपन होतो. नंतर तुम्ही पुन्हा पॅटर्न बदलवून नवीन लॉक लावू शकता.

पद्धत -2

जर तुमच्याकडे गूगल अकाउंटचं यूझर नेम आणि पासवर्ड नसेल किंवा तो पासवर्ड फोन घेत नसेल किंवा तुम्ही गूगलचाही पासवर्ड विसरला असाल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याठिकाणी इंटरनेटची रेंजच नसेल तर काय?कारण तसं झालं तर गूगलचं यूझर नेम आणि पासवर्ड व्हेरिफाय होतच नाही.  त्यामुळे तुम्ही पॅटर्न अनलॉक  करू शकत नाही. त्यावेळी दुसरी एक पद्धत वापरता येते. त्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन ऑफ करावा लागेल त्यानंतर स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू करावा लागेल. स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू करण्याच्या पद्धती प्रत्येक  हॅण्डसेटच्या वेगवेगळ्या असू शकतात. मात्र, कॉमन पद्धत म्हणजे पॉवर बटन प्लस व्हॉलूम डाउन हे बटन प्रेस केलं की बरेच स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू होतात. एकदा का तुमचा स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू झाला की,त्यामध्ये बरेच ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्यापैकीच एक म्हणजे फॅक्टरी रिसेट.

पण लक्षात ठेवा, हे असं करताना तुमचा सगळा डेटा जातो. त्यामुळे आधी फोनचा बॅकअप घ्या. म्हणजेच फोटो किंवा  फाइल्स किंवा आणखी काही डेटा फाइल्स असतील तर त्याचाही बॅकअप घ्या. स्मार्टफोनचा बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन कॉम्प्युटरच्या यूएसबी पोर्टला जोडावा लागेल.त्यानंतर माय कॉम्प्युटरमध्ये जाऊन तुमच्या डिटेक्ट झालेल्या स्मार्टफोन ड्राइव्हमधून तुमचा डेटा कॉपी करून घ्या.  स्मार्टफोन रिसेट करण्यापूर्वी स्मार्टफोन मधील एसडी कार्ड (मेमरी कार्ड) सेफ्टीसाठी म्हणून काढून घ्या. त्यानंतरच स्मार्टफोन रिसेट करा. म्हणजे स्मार्टफोन एसडी कार्ड (मेमरी कार्ड) वरील डेटा सेफ राहील. स्मार्टफोन रिसेट होऊन पॅटर्न लॉक  निघून जाईल आणि तुमचा स्मार्टफोन परत मूळ रुपात येईल. फक्त हे सारं करताना डोकं शांत ठेवा, तरच डाटा वाचेल! 

पॅटर्न लॉक सेट कसं करतात ते बघू

फोनच्या मेन्यूमधून सिस्टिम सेटिंगमध्ये जा. तिथं ‘पर्सनल’मध्ये एक सिक्युरिटी हे ऑप्शन असतं. त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रिन सिक्युरिटी हे ऑप्शन दिसेल. त्याखाली स्क्रिनलॉक वर क्लिक केलं की, आतमध्ये सात वेगवेगळे स्क्रिन लॉक ऑप्शन दिसतात. नन, स्लाइड, फेस अनलॉक, व्हॉइस अनलॉक, पॅटर्न, पिन आणि शेवटचं म्हणजे पासवर्ड.  पॅटर्नवर क्लिक केलं की, ‘चूझ यूवर पॅटर्न’ असा पर्याय येतो. त्यातून एक पॅटर्न निवडून ते तुम्ही कन्फर्म केलं की,  झालं तुमचे पॅटर्न लॉक सेट.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल