आजकाल प्रत्येक तरुणाला युट्यूबर बनण्याचे वेध लागले आहेत. पण, फक्त कॅमेरा समोर उभे राहून बोलले की चॅनेल चालते असे नाही. तुमच्या चॅनेलचे नाव हे तुमच्या ब्रँडची ओळख असते. अनेकदा लोक तुमचा चेहरा विसरतात, पण चॅनेलचे नाव त्यांच्या लक्षात राहते. जर, चॅनेलचे नाव चपखल आणि लक्षात राहण्यासारखे असेल, तर युट्यूबचा अल्गोरिदम देखील तुम्हाला साथ देतो आणि तुमचे व्ह्यूज अन् फॉलोअर्स वेगाने वाढू शकतात.
कंटेंट आणि नावाचं नातं असावं घट्ट!
तुमच्या चॅनेलचे नाव पाहिल्याबरोबर प्रेक्षकांना हे समजले पाहिजे की, तुम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवता. समजा, तुम्ही खेळांशी संबंधित माहिती देता, तर नावात 'स्पोर्ट्स' किंवा 'खेळ' हा शब्द असणे फायद्याचे ठरते. जर तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ बनवत असाल आणि चॅनेलचे नाव 'टेक गुरु' ठेवले, तर प्रेक्षक गोंधळून जातील. त्यामुळे विषयाशी सुसंगत नाव असणे ही यशाची पहिली पायरी आहे.
नाव कसं असावं? छोटं, स्पष्ट अन् युनीक!
१. छोटं नाव: नाव जेवढं छोटं असेल, तेवढं ते लक्षात ठेवणं सोपं जातं. फार लांबलचक नावे लोक विसरून जातात.२. स्पष्टता: नाव उच्चारायला सोपे असावे. कठीण शब्दांचा वापर टाळावा, जेणेकरून कोणालाही ते सहज सर्च करता येईल.३. युनीकनेस: इतरांच्या चॅनेलची नक्कल करू नका. तुमचे नाव इतरांपेक्षा वेगळे असेल, तर सर्च रिझल्टमध्ये तुमचे चॅनेल वर येण्याची शक्यता वाढते.
व्ह्यूज वाढवण्यासाठी नावाचा फायदा
युट्यूबवर जेव्हा कोणी एखादा विषय सर्च करते, तेव्हा चॅनेलचे नाव सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये अर्थात एसईओ महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुमच्या नावात तुमच्या विषयाचे कीवर्ड्स असतील, तर युट्यूब तुमचे व्हिडिओ योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. यामुळेच योग्य नावामुळे केवळ व्ह्यूजच नाही, तर सबस्क्रायबर्सची संख्याही झपाट्याने वाढते.
त्यामुळे, जर तुम्ही नवीन चॅनेल सुरू करण्याचा विचार करत असाल, तर घाईघाईत कोणतेही नाव देऊ नका. थोडा विचार करा, रिसर्च करा आणि मगच तुमच्या डिजिटल दुकानाची पाटी म्हणजेच चॅनेलचे नाव नक्की करा.
Web Summary : Choosing the right YouTube channel name boosts visibility and attracts viewers. Align the name with your content, keep it short, unique, and easy to search. Keywords in the name improve SEO, driving views and subscribers.
Web Summary : सही यूट्यूब चैनल का नाम चुनने से विजिबिलिटी बढ़ती है और दर्शक आकर्षित होते हैं। नाम को अपनी सामग्री के अनुरूप रखें, इसे छोटा, अनोखा और खोजने में आसान रखें। नाम में कीवर्ड SEO को बेहतर बनाते हैं, जिससे व्यूज और सब्सक्राइबर बढ़ते हैं।