शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स; 5GB डेटा फ्री आणि बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 10:48 IST

जर तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण यामध्ये काही प्लॅन्समध्ये रोजच्या डेटासोबत फ्री डेटाची सुविधाही मिळते. 

नवी दिल्ली :  व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.  जिओ आणि एअरटेलनंतर व्होडाफोन-आयडियाच्या युजर्सची संख्या सर्वाधिक आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना सोयीस्कर सेवा देण्यासाठी नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स आणत असते. जर तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण यामध्ये काही प्लॅन्समध्ये रोजच्या डेटासोबत फ्री डेटाची सुविधाही मिळते. 

व्होडाफोन-आयडियाकडे अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. दरम्यान, व्होडाफोन-आयडियाच्या लिस्टमध्ये असे 4 प्लॅन्स देखील आहेत, ज्यामध्ये युजर्सला 5GB अतिरिक्त डेटा पूर्णपणे मोफत मिळतो. जर तुम्ही असे काही काम करत असाल, ज्यासाठी जास्त डेटा आवश्यक असतो, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. यासोबतच, या सर्व प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस सोबत वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळते. 

Vi चा 666 रुपयांचा प्लॅनव्होडाफोन-आयडियाचा हा रिचार्ज प्लॅन 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3GB डेटा मिळतो. यासोबतच यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये युजर्सना 5GB डेटा मोफत मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटा सारख्या विशेष सुविधा देखील मिळतात. डेटा रोलओव्हरमध्ये तुम्ही सोमवार ते शुक्रवार शनिवार आणि रविवारी उर्वरित डेटा वापरू शकता. 

Vi चा 699 रुपयांचा प्लॅनव्होडाफोन-आयडियाचा हा प्लॅन 77 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगसोबत 100SMS मोफत मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये व्होडाफोन-आयडियाचा युजर्सना 3 दिवसांसाठी 5GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटा सेवा देखील मिळते. 

Vi चा 719 रुपयांचा प्लॅनतुम्ही तुमचा व्होडाफोन-आयडियाचा नंबर 719 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 77 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5GB डेटा मिळतो. यासोबतच, मोफत व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधाही मिळते. तसेच, यामध्ये कंपनीकडून 3 दिवसांसाठी 5GB फ्री डेटा दिला जातो. इतर प्लॅन्सप्रमाणे, यात वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटाची सुविधा देखील आहे. 

Vi चा 839 रुपयांचा प्लॅनव्होडाफोन-आयडियाच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. कंपनी आपल्या युजर्सना 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करते. यामध्ये मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS ची सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 5GB डेटा मोफत मिळतो. या प्लॅनची ​​सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये ग्राहकांना Disney + Hotstar मोबाईलचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.  

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)