शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शानदार रिचार्ज प्लॅन! फक्त 8 रुपये खर्च करून दररोज मिळेल 4GB डेटा अन् फ्री कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 16:51 IST

best recharge plan : कंपन्यांचे काही प्लन असेही आहेत ज्यात दररोज फक्त 8 रुपये खर्च करून 4 जीबी डेटा मिळत आहे.

ठळक मुद्देकोरोना महामारी आल्यापासून इंटरनेट सेवेचा वापर 10 पट वाढला आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारी आल्यापासून इंटरनेट सेवेचा वापर 10 पट वाढला आहे. कोरोनामुळे अनेक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये सर्व बंद आहेत. अशा परिस्थितीत लोक आपले कार्यालयीन काम आणि शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आपला अभ्यास इंटरनेटद्वारे ऑनलाइन करत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरात चांगल्या इंटरनेट कनेक्शनची मागणी करतो, जेणेकरून काम लवकर आणि सुलभ पद्धतीने करता येईल. (vodafone, idea, airtel, jio best recharge plan of 4gb data daily by giving just 8 rupees per day)

जर, तुमच्याकडे ब्रॉडबँड इंटरनेट नसल्यास, तुम्हाला टेलिकॉम कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनचा वापर करू शकता, ज्यामध्ये युजर्सला 4 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे, कंपन्यांचे काही प्लन असेही आहेत ज्यात दररोज फक्त 8 रुपये खर्च करून 4 जीबी डेटा मिळत आहे.

व्होडाफोन-आयडिया प्लॅन499 रुपयांच्या व्होडाफोन-आयडिया प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 4 जीबी डेटा दिला जातो, ज्याची वैधता 56 दिवस आहे. म्हणजेच, दररोज केवळ 8 रुपये खर्च करून ग्राहक या डेटाचा फायदा मिळवू शकतात. याचबरोबर, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलसह दररोज 100 एसएमएस मोफत मिळत आहेत. या प्लॅनमध्ये युजर्सला बिंज ऑल नाइट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट सुद्धा दिले जात आहे. तसेच, या प्लॅनमध्ये Movies आणि TV अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे.

जिओचा 349 रुपयांच्या प्लॅनजिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जातो, ज्याची वैधता 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस मिळतात. जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सला जियो अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे.

एअरटेलचा 558 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या 558 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 3 जीबी डेटा मिळत आहे. ज्याची वैधता 56 दिवसांची आहे. जे लोक दररोज जास्त इंटरनेटचा वापर करतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन अधिक चांगला आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेटbusinessव्यवसायVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेलJioजिओ