शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

व्होडाफोनने ट्रायकडे केली 5G Unlimited ची तक्रार; एअरटेल, जिओने सांगितले 'किती जीबी फ्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 20:32 IST

व्होडाफोन आयडिया अद्याप ५जी सेवा सुरु करू शकलेली नाहीय. एअरटेल, जिओ यांनी सव्वा वर्षापूर्वी फाईव्ह जी सेवा सुरु केली आहे.

व्होडाफोन आयडियाला एअरटेल, जिओची ट्रायकडे तक्रार करणे चांगलेच महागात पडले आहे. तुम्ही स्वत: 4G अनलिमिटेड ऑफर्स देता, मग जिओ, एअरटेलविरोधात तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत ट्रायने व्होडाफोन आयडियाला फटकारले आहे. याचबरोबर जिओ, एअरटेलला अनलिमिटेडबाबत अटी आणि शर्थी जारी करण्यास सांगितले आहे. 

व्होडाफोन आयडिया अद्याप ५जी सेवा सुरु करू शकलेली नाहीय. एअरटेल, जिओ यांनी सव्वा वर्षापूर्वी फाईव्ह जी सेवा सुरु केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना फोरजीच्या रिचार्जवर अनलिमिटेड फाईव्ह जी डेटा ऑफर केला आहे. यावरून या दोन्ही कंपन्या अनलिमिटेड फाईव्ह जी डेटा देण्यावरून ग्राहकांशी खोटे बोलत असल्याची तक्रार व्हीआयने केली होती. 

यावरून ट्रायने दोन्ही कंपन्यांना अनलिमिटेड फाईव्ह जी डेटावरून अतिशय स्पष्ट शब्दांत अटी आणि शर्थींची माहिती द्यावी, अशा सूचना केल्या आहेत. दुसऱ्या बाजुला व्होडाफोन आयडियाची तक्रार ट्रायने फेटाळली आहे. व्हीआय स्वत: 4G डेटा ऑफरिंगद्वारे कित्येक प्लॅन जाहीर करत आहे. यामुळे इतर कंपन्यांच्या अनलिमिटेड डेटा ऑफर प्लानवरून तक्रार करण्याचे कारण बनत नाहीय, असे ट्रायचे म्हणणे आहे. याबाबतची बातमी ईटीने दिली आहे. 

ट्रायच्या सुचनेनंतर एअरटेलने अनलिमिटेड फाईव्ह जी डेटा बाबत युजरला माहिती देण्यावर भर दिला आहे. अनलिमिटेड फाईव्ह जी म्हणजे ३० दिवसांसाठी अधिकाधिक ३०० जीबी डेटा मोफत दिला जाणार आहे. तर जिओने अनलिमिटेडचा अर्थ अनंत असा नाही, असे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Vodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)JioजिओAirtelएअरटेल