शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

11GB रॅम, 64MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह Vivo Y53s NFC लाँच; जाणून घ्या किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 20:06 IST

Vivo Y53s NFC Phone launch: Vivo Y53s NFC इंडोनेशियामध्ये 3,699,000 IDR मध्ये लाँच केला गेला आहे, ही किंमत भारतीय चलनानुसार सुमारे 19,000 रुपये होते.  

Vivo ने गेल्याच आठवड्यात भारतात आपल्या वाय सीरिजमध्ये Vivo Y72 5G स्मार्टफोन लाँच केला होता. आज या सीरिजमध्ये कंपनीने अजून नवीन स्मार्टफोन जोडला आहे. विवोने जागतिक बाजारात Vivo Y53s NFC लाँच केला आहे. या सीरीजमध्ये Vivo Y53s 4G आणि Vivo Y53s 5G स्मार्टफोननंतर हा तिसरा स्मार्टफोन आहे. आज सादर झालेला विवो वाय53एस एनएफसी एडिशनमध्ये 8GB रॅम आणि 64MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे.  

Vivo Y53s NFC चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y53s NFC मध्ये 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा वॉटर ड्रॉप नॉच डिजाईन असलेला डिस्प्ले 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. हा विवो फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेट दिला आहे.  

हा फोन 8 जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे, सोबत 3 जीबी वर्च्युल रॅम देण्यात आला आहे. म्हणजे Vivo Y53s NFC फोन 11GB पर्यंत रॅमला सपोर्ट करतो. फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येते. 

Vivo Y53s NFC मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा विवो फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. इंडोनेशियामध्ये हा फोन 3,699,000 IDR मध्ये लाँच केला गेला आहे, ही किंमत भारतीय चलनानुसार सुमारे 19,000 रुपये होते.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड