विवो कंपनीचा नवा स्मार्टफोनविवो व्हाय ५० आय बाजारात दाखल झाला आहे. हा बजेट स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला. फोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी देण्यात आली, जी झटक्यात चार्ज होऊन दिर्घकाळ टिकेल. हा फोन चीनमध्ये लॉन्च झाला असू त्याची किंमत किंमत १४९९ युआन (अंदाजे १८ हजार ५६५) आहे.
विवो व्हायर ५० आय: डिस्प्ले
या फोनमध्ये ६.७४ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट ९०Hz असून, १००० nits ची पीक ब्राइटनेस आहे. तसेच, डोळ्यांच्या संरक्षणासाठी यात DC Dimming आणि डार्क मोडसारखे फिचर्स आहेत. हा फोन TUV Rheinland Low Blue Light सर्टिफिकेशनसह येतो.
विवो व्हायर ५० आय: कॅमेरा
फोटोग्राफीसाठी यात १३- मेगापिक्सलचा एआय रिअर कॅमेरा आणि ५-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला. यात AI Erase सारखे उपयोगी एआय टूल्स देखील आहेत.
विवो व्हाय ५० आय:प्रोसेसर आणि स्टोरेज
विवो व्हाय ५० आयमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आहे, जो चांगल्या परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. हा फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
विवो व्हायर ५० आय: बॅटरी आणि चार्जिंग
फोनमध्ये ६००० mAh ची मोठी बॅटरी आहे, जी १५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
विवो व्हायर ५० आय: ऑपरेटिंग सिस्टम आणि कनेक्टिव्हिटी
हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Origin OS 5 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi, Bluetooth 5.4 आणि 3.5mm हेडफोन जॅक उपलब्ध आहे.
महत्त्वाचे म्हणजे, विवोने नुकतेच भारतात विवो व्हाय ३१ प्रो आणि व्हाय ३१ हे दोन नवीन फोन लॉन्च केले आहेत. मात्र, विवो व्हाय ५० आय भारतात कधी लॉन्च होईल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.