गरजेनुसार वाढवता येणार या स्मार्टफोनचा रॅम; 12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Vivo Y33s येणार भारतात

By सिद्धेश जाधव | Published: August 20, 2021 11:44 AM2021-08-20T11:44:07+5:302021-08-20T14:05:32+5:30

Vivo Y33s Price: विवो वाय33एस स्मार्टफोनमध्ये Helio G80 चिपसेटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला होता. Vivo Y33s स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे

Vivo Y33s listed on amazon india price at rs 17990 with 50MP camera Helio G80 8GB RAM 5000mAh battery | गरजेनुसार वाढवता येणार या स्मार्टफोनचा रॅम; 12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Vivo Y33s येणार भारतात

सौजन्य: 91mobiles

googlenewsNext
ठळक मुद्देVivo Y33s स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 4GB एक्सटेंडेड रॅम मिळतो, एकूण या फोनमध्ये 12GB रॅम वापरता येतो.

विवो भारतात आपल्या वाय सीरिजचा विस्तार करत दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार Vivo Y33s आणि Vivo Y21 2021 हे दोन स्मार्टफोन्स भारतात दाखल होणार आहेत. यातील विवो वाय21 स्मार्टफोन कंपनीने मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेटसह सादर केला आहे. या दोन्ही विवो फोन्समध्ये एक्सटेंडेड रॅम फिचर देण्यात आले आहे. गरजेनुसार तुम्ही तुमच्या फोनचा रॅम वाढवू शकता. विवो वाय33एस स्मार्टफोन Helio G80 चिपसेटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला होता, आता या फोनची लिस्टिंग हटवण्यात आली आहे. परंतु 91mobiles ने लिस्टिंगमधून Vivo Y33s च्या स्पेक्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती मिळवली आहे.   

Vivo Y33s चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y33s मधील डिस्प्ले तिन्ही कडा बेजल लेस आणि रुंद चीन पार्टसह सादर करण्यात आला आहे. हा एक  6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. वॉटर ड्रॉप नॉच असलेला हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2408x1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या विवो फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 4GB एक्सटेंडेड रॅम मिळतो, एकूण या फोनमध्ये 12GB रॅम वापरता येतो. या फोनमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11.1 सह चालतो. हे देखील वाचा: विवोचा नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 5000mAh बॅटरी, 5GB रॅमसह Vivo Y21 बाजारात दाखल

Vivo Y33s स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सरला मिळतो. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंटसह या फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. विवो वाय33एस महिला 5,000एमएएच ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. Vivo Y33s चा एकमेव रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट मिडडे ड्रीम आणि मिरर ब्लॅक अश्या दोन रंगात अ‍ॅमेझॉन इंडियावर 17,990 रुपयांमध्ये लवकरच उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: आता टेम्परेचर गनचे देखील काम करणार स्मार्टफोन! 8500mAh बॅटरी आणि बिल्टइन थर्मामीटरसह आला हा स्मार्टफोन

Web Title: Vivo Y33s listed on amazon india price at rs 17990 with 50MP camera Helio G80 8GB RAM 5000mAh battery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.