Vivo फॅन्ससाठी खुशखबर; लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 5,000mAh Battery सह करणार एंट्री  

By सिद्धेश जाधव | Published: January 6, 2022 07:38 PM2022-01-06T19:38:57+5:302022-01-06T19:39:06+5:30

Vivo Y01: Vivo Y01 हा कंपनीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन असेल. ज्यात अँड्रॉइड गो एडिशनचा वापर केला जाऊ शकतो.

Vivo Y01 may launch with 3gb ram Full Specs Price leaked before launch  | Vivo फॅन्ससाठी खुशखबर; लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 5,000mAh Battery सह करणार एंट्री  

Vivo फॅन्ससाठी खुशखबर; लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 5,000mAh Battery सह करणार एंट्री  

Next

VIVO एका नवीन लो बजेट स्मार्टफोनवर काम करत असल्याची बातमी आली आहे. हा फोन कंपनीच्या लोकप्रिय ‘वाय’ सीरीजमध्ये Vivo Y01 नावानं लाँच केला जाईल. कंपनीनं या एंट्री लेव्हल स्मार्टफोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु लिक्स आणि रिपोर्ट्समधून Vivo Y01 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची माहिती समोर आली आहे. त्यानुसार हा फोन सर्वप्रथम युरोपात सादर केला जाईल.  

Vivo Y01 चे लीक स्पेसिफिकेशन्स  

लीकनुसार, Vivo Y01 मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा एक एलसीडी पॅनल असेल जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. कंपनी या फोनची किंमत कमी ठेवण्यासाठी अँड्रॉइड 11 ‘गो’ एडिशनचा वापर करू शकते जो फनटच ओएस 11.1 वर चालेल. अँड्रॉइड गो हे अँड्रॉइडचं हलकं व्हर्जन आहे, त्यामुळे फोनमध्ये स्ट्रॉन्ग प्रोसेसर, रॅम व स्टोरेजची गरज पडत नाही.  

लीकनुसार हा विवो फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह बाजारात येईल. पॉवर बॅकअपसाठी Vivo Y01 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सपोर्टसह देण्यात येईल. फोटोग्राफीसाठी Vivo Y01 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर असेल. तर फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.  

विवो वाय01 लवकरच बाजारात येईल, असं सांगण्यात आलं आहे. लीकमध्ये या फोनच्या किंमतीचा अंदाज देखील लावण्यात आला आहे. त्यानुसार या विवो फोनची किंमत 100 यूरोच्या आसपास असेल. ही किंमत भारतीय करंसीनुसार 8,500 रुपयांच्या आसपास आहे.  

हे देखील वाचा:

काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी

OPPO ची दमदार कामगिरी; 13GB RAM, 33W फास्ट चार्जिंगसह आणला OPPO A96 5G Phone

Web Title: Vivo Y01 may launch with 3gb ram Full Specs Price leaked before launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.