शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Vivo V11 Pro Review : कशासाठी घ्याल? कॅमेरा की ड्रॉप नॉच, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसाठी

By हेमंत बावकर | Updated: November 20, 2018 19:00 IST

बजेट रेंजच्या प्रिमिअम श्रेणीतील Vivo V11 Pro चा लोकमतच्या टीमने घेतलेला प्रदीर्घ रिव्ह्यू. यामध्ये कॅमेरा, डिझाईन, परफॉर्मन्स,ड्रॉपनॉच आणि इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आदी बाबींवर सखोल निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : Vivo V11 Pro लाँच होऊन दोन महिने झाले. लोकमतच्या टीमने व्हिवो व्ही 11 प्रो हा मोबाईल या काळात रिव्ह्यूसाठी वापरला. 25,999 रुपये किंमतीमध्ये कॅमेरा, बॅटरी, स्क्रीन आदी बाबींवर या आमच्या टीमला हा Starry Night Black रंगातील बजेट प्रिमिअम मोबाईल कसा वाटला चला पाहुया...

व्हिवोने बजेट प्रिमिअम रेंजच्या फोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा भारतातील पहिला फोन आहे. प्रिमिअम फोन निर्माता कंपनी OnePlus ने 6T मध्ये नुकतेच हे फिचर दिले आहे.

व्हिवोने स्वत: हा Vivo V11 Pro डिझाईन केला आहे. 156 ग्रॅम वजनामुळे हा फोन हलका वाटतो. बॅक कव्हर ग्लॉसी असल्याने आकर्षक वाटत असले तरीही फोन हातातून निसटण्याची शक्यता जास्त आहे. 

डिस्प्ले : Vivo V11 Pro मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अॅमोल्ड डिस्प्ले वापरण्यात आला आहे. हा डिस्प्ले यापूर्वी सॅमसंगच्या प्रिमिअम मोबाईलमध्ये वापरला जायचा. Super AMOLED डिस्प्लेमुळे फोटो किंवा व्हिडिओ एकदम क्लिअर दिसतात. तसेच स्क्रीनवरच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. एक- दोन सेकंदात बोट स्कॅन करून डिस्प्ले ऑन करतो. मात्र काहीवेळा ठसे स्कॅन करताना अपयश आल्याचे आढळले आहे. ड्रॉप नॉचमुळे स्क्रीन आणखी उठावदार दिसते. व्हिडिओ किंवा फोटो पाहताना काही अॅप ड्रॉप नॉचसह दिसतात तर काही अॅप ड्रॉप नॉच बाहेर ठेवून स्क्रीन क्रॉप करतात. 2340x1080 रिझोल्युशनची स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आली आहे. स्क्रीनवरही छोटे छोटे ओरखडे उमटत असल्याने स्क्रीन गार्ड लावणे योग्य. 

डिझाईन : Vivo V11 Pro या फोनला ग्लॉसी लूक देण्यात आल्याने फोन प्रिमिअम वाटतो. पाठीमागील कव्हरवर हाताचे ठसे उमटतात. तसेच ओरखडेही उमटतात. यामुळे हा फोन कव्हरमध्ये ठेवलेला उत्तम. ड्युअल कॅमेराला ग्लोल्ड बॉर्डर देण्यात आलेली आहे. मध्यभागी Vivo लोगो आणि खालच्या बाजुला Designed by vivo हा टॅग आहे. फोनच्या उजव्या बाजुला साऊंड आणि ऑन-ऑफ बटन देण्यात आलेले आहे.

खालील बाजुला 3.5 एमएम ऑडिओ जॅक, मध्यभागी चार्जर पिनसाठी जागा आणि उजव्या बाजुला स्पीकर. चार्जर पीन उलट्या बाजुने बसवावी लागते. डाव्या बाजुला सिम इजेक्टर असून ड्युअल नॅनो सिमसह मेमरी कार्डसाठी जागा दिलेली आहे. यामुळे दोन सिमसह जादा मेमरीही मिळू शकते. दोन्ही सिम 4जी सपोर्ट (ड्युअल स्टँडबाय )करतात. 

 बॅटरी : Vivo V11 Pro मध्ये 3400 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी ड्युअल इंजिन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अर्ध्या तासात जवळपास 60 टक्के बॅटरी चार्ज होते. मोबाईल वापरताना सतत व्हॉट्सअॅप, इंटरनेट, व्हिडिओ अशा मध्यम वापरासाठी 10 तासांत बॅटरी निम्मी संपते. यामुळे सर्वसाधारण वापरासाठी बॅटरी दीड दिवस येते. महत्वाचे म्हणजे बॅटरी चार्ज करताना फोन गरम होत नाही. 

परफॉर्मन्स : आम्हाला मिळालेला Vivo V11 Pro हा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेसचा आहे. यामध्ये 256 जीबी मेमरी कार्ड सपोर्ट आहे. अँड्रॉईड 8.1 या ऑपरेटिंग सिस्टिमवर व्हिवोची फनटच ओएस 4.5 देण्य़ात आली आहे. मोबाईल वापरण्यास चांगला असला तरीही काहीवेळा अॅप ओपन होताना किंवा नेव्हिगेट करताना हँग होतात. केवळ एखादे अॅप हँग होत असल्याने इतर अॅप किंवा फिचर वापरता येतात. मोबाईलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660AIE ऑक्टाकोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. शाओमीच्या पोको एफ 1 किंवा वनप्लस 6T मधील 845 पेक्षा कमी असला तरीही स्मूथ काम करतो. तसेच कॅमेरा किंवा हेव्ही गेम खेळताना गरम होत नाही. 

कॅमेरा : Vivo V11 Pro हा मोबाईल कॅमेरा आणि म्युझिकसाठी कंपनीने लाँच केलेला असला तरीही म्युझिकपेक्षा कॅमेऱ्यासाठीच चांगला आहे. मोबाईलमध्ये पाठीमागे ड्युअल सेन्सर 12 एमपी f/1.8 अपार्चरचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 एमपीचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे.

रिअर कॅमेरा प्रकाशात चांगले फोटो खेचतो. मात्र, रात्रीच्या अंधारात किंवा आर्टिफिशिअल लाईटमध्ये कॅमेराच्या मर्यादा उघड होतात.

फोटोतील वस्तू किंवा व्यक्तींच्या चेहऱ्याच्या डिटेल्स घेण्यात कॅमेरा खूपच कमी पडतो. यामुळे ग्रुप फोटो काढताना पुरेसा प्रकाश असल्यास छान फोटो घेता येतील. यासाठी काही फोटो आम्ही काढले आहेत.

रिअर कॅमेरा अगेन्स्ट लाईटही चांगले क्लिअर फोटो खेचतो. चांगली फोटोग्राफी करायची असल्यास प्रोफेशनल मोडमध्येच करावी.

अन्यथा स्क्रीनवर फोकस करण्यासाठी टॅप केल्यास फोटो लगेच क्लीक होत असल्याने डिटेल्स येत नाहीत. 

व्हिडिओ : लो लाईटमध्ये व्हिडिओ घेताना कॅमेराला झगडावे लागते. तसेच केवळ 1080p किंवा 720p या दोन रिझॉल्यूशनमध्येच व्हिडिओ रेकॉर्ड करता येतो. 4K व्हिडिओ रेकॉर्ड केल्यास लो लाईटमध्ये थोडा क्लिअर व्हिडिओ येतो. तसेच एखादा नाचतानाचा किंवा धावता व्हिडिओ असल्यास डिटेल्स मार खातात. यावेळी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलायझेशनची कमतरता जाणवते. फोटो काढतानाही जर वस्तू हलती असल्यास फोटो शेक होतात. 

ड्रॉपनॉच : फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सलचा असून यामध्ये सेल्फी चांगले येतात. डिस्प्ले ड्रॉपनॉच असल्याने कॅमेरा त्यात बसविण्यात आला आहे. फेसअनलॉकसाठी आयआर सेन्सरही देण्यात आला आहे. तसेच वरील बाजुला स्पीकर छोट्या साईजचा देण्यात आला आहे. तसेच वरच्या बाजुला नॉईस कॅन्सलेशन सेन्सरही देण्यात आला आहे. फेसअनलॉक हे फिचर काळोखातही चांगल्याप्रकारे काम करते. मोबाईलसमोर चेहरा आल्याआल्याच फोन अनलॉक होतो. इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरपेक्षा वेगात हे फिचर काम करते. 

कमतरता : जर तुम्ही एफएम ऐकण्याचे शौकिन असाल तर Vivo V11 Pro तुम्हाला निराश करणारा आहे. एफएम सुरु केल्यावर एवढे डिस्टरबन्स येतात की काही क्षणात एफएम बंद करावे लागते. एफएमचे सिग्नल खेचण्याची क्षमता फारच कमी आहे. स्क्रॅच किंवा डॅमेजपासून वाचण्यासाठी फोनला बॉडी कव्हर आणि टेम्पर्ड ग्लास प्रोटेक्शन द्यावेच लागेल. यासाठी कंपनी बॉक्समध्ये क्लीअर कव्हर देते. 

आमचे मत : व्हिवोचा हा बजेट प्रिमिअम फोन फोटोग्राफीसाठी चांगला वाटला. काही अपवाद वगळता कॅमेराने आम्हाला निराश केले नाही. बॅटरी बॅकअपही चांगला असल्याने दिवसभर बाहेर असणाऱ्यांसाठी एकदाही फोन चार्ज करण्याची वेळ येणार नाही. सुपर अॅमोल्ड डिस्प्ले हा काहीसा बेभरवशाचा आहे. मोबाईल अपघाताने खाली पडल्यास डिस्प्लेला मार बसण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे कंपनीने 999 रुपयांत सहा महिन्यांत एकदा डिस्प्ले बदलून देण्याचे वचन दिलेले आहे. डिस्प्लेसोबत फिंगरप्रिंट सेन्सरही बदलावा लागतो. पाठीमागच्या ग्लॉसी कव्हरला पटकन स्क्रॅच येत असल्याने 26 हजाराचा हा मोबाईल कव्हरमध्ये ठेवलेलाच फायद्याचे आहे. एकंदर फिचर पाहता 5 पैकी आम्ही 4.3 रेटिंग या मोबाईल देत आहोत. शाओमीच्या पोको एफ 1 पेक्षा या फोनचा रिअर आणि सेल्फी कॅमेरा चांगला आहे. सध्या Vivo V11 Pro या फोनवर कंपनीकडून एक्स्ट्रा एक्स्चेंज बोनस आणि बँक डिस्काऊंट मिळत असल्याने 17 ते 20 हजारच्या आसपास हा फोन घेता येतो. या रेंजमध्ये हा फोन चांगला पर्याय आहे. 

टॅग्स :Vivo V11 Proव्हिवो व्ही 11 प्रोMobileमोबाइलVivoविवोOneplus 6Tवनप्लस 6Txiaomiशाओमी