शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

फुटलेला डिस्प्ले Vivo मोफत बदलून देणार; एक्सटेंडेड वॉरंटीसह मिळणार 10 हजारांचे बेनिफिट्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 18:39 IST

Vivo Special Offer: विवोने आपल्या काही स्मार्टफोन्सच्या खरेदीवर मोफत गिफ्ट्स आणि बेनिफिट्स देण्यास सुरवात केली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.  

काही दिवसांपुवी विवोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y53s लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 64MP चा कॅमेरा, 5000mAh बॅटरी असे जबरदस्त फिचर दिले होते. आता विवो आपल्या निवडक स्मार्टफोन्सच्या खरेदीवर भन्नाट ऑफर्स देत आहे. यात वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि एक्सटेंडेड वॉरंटी अश्या बेनिफिट्सचा समावेश आहे.  

मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट 

Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीजमधील स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनीने अतिरिक्त बेनिफिट्स देण्यास सुरुवात केली आहे. ही ऑफर 11ऑगस्टपासून सुरु झाली आहे आणि 23 ऑगस्टपर्यंत या ऑफरचा फायदा घेता येईल. या कालावधीत विकत उपरोक्त सीरिजमधील नवीन स्मार्टफोन विकत घेतल्यास युजर्संना कार्ड ऑफर्स, ईएमआय ऑफर्स, वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, मोफत लॅपटॉप बॅग आणि एक्सटेंडेड वॉरंटी मिळेल.  

या ऑफरमुळे Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीजमधील स्मार्टफोन नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत विकत घेता येतील. तसेच खरेदी करताना HDFC, ICICI आणि Kotak Mahindra बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच या स्मार्टफोनचा डिस्प्ले खरेदीनंतर 6 महिन्यात फुटल्यास वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट अंतर्गत मोफत बदलून देण्यात येईल. तसेच 10 हजार रुपयांचे जिओ बेनिफिट्स देखील मिळतील.  

एक्सटेंडेड वॉरंटी 

15 हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यास ग्राहकांना अश्योर्ड गिफ्ट मिळेल. या अश्योर्ड गिफ्टमध्ये लॅपटॉप बॅगचा समावेश आहे. 25 ऑगस्ट पर्यंत 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्रॉडक्ट केल्यास 6 महिन्याची मोफत एक्सटेंडेड वॉरंटी देण्यात येईल.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोन