झक्कास सेल्फीसाठी दोन शानदार कॅमेऱ्यांसह Vivo S12 Pro 5G Phone होणार लाँच; माहिती आली समोर 

By सिद्धेश जाधव | Published: December 3, 2021 05:50 PM2021-12-03T17:50:42+5:302021-12-03T17:51:35+5:30

Vivo S12 Pro 5g Phone: Vivo लवकरच बाजारात Vivo S12 आणि S12 Pro हे दोन फोन सादर करणार आहे. यातील प्रो मॉडेल 108MP Rear Camera आणि 50MP + 2MP Dual Selfie Camera सह बाजारात येऊ शकतो.  

Vivo s12 pro 5g Phone launching with 108mp rear and 50mp dual selfie camera   | झक्कास सेल्फीसाठी दोन शानदार कॅमेऱ्यांसह Vivo S12 Pro 5G Phone होणार लाँच; माहिती आली समोर 

झक्कास सेल्फीसाठी दोन शानदार कॅमेऱ्यांसह Vivo S12 Pro 5G Phone होणार लाँच; माहिती आली समोर 

Next

Vivo आपल्या ‘एस’ सीरिजचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. कंपनी लवकरच Vivo S12 आणि S12 Pro हे दोन फोन बाजारात आणू शकते. यातील प्रो व्हेरिएंटचे काही फोटो लाँचपूर्वीच लीक झाले आहेत. तसेच या फोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे. आगामी Vivo S सीरीजमध्ये 108MP रियर कॅमेरा आणि 50MP चा ड्युअल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. टिपस्टर Digital Chat Station नं Vivo S12 Pro च्या कॅमेरा फीचर्सची माहिती दिली आहे.  

Vivo S12 Pro चे लीक स्पेक्स  

Vivo S12 Pro मध्ये कंपनी फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेला OLED डिस्प्ले देईल. जो हाय रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात येईल. या फोनमध्ये ड्युअल पंच-होल सेल्फी कॅमेरा मिळेल. ज्यात 50MP चा Samsung JN1 प्रायमरी सेल्फी कॅमेरा आणि 2MP चा दुसरा सेल्फी कॅमेरा मिळेल. Vivo S12 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा असेल. त्याला 8MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP च्या थर्ड सेन्सरची जोड देण्यात येईल.  

या आगामी Vivo फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC ची ताकद मिळेल. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OriginOS वर चालेल. फोनमधील बॅटरी क्षमतेची माहिती मिळाली नाही, परंतु यात 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार या फोनची किंमत 3,000 युआन (सुमारे 35,300 रुपये) असू शकते. 

Web Title: Vivo s12 pro 5g Phone launching with 108mp rear and 50mp dual selfie camera  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.