Android Tablet: Vivo करणार टॅबलेट सेगमेंटमध्ये पदार्पण; 8040mAh बॅटरीसह होऊ शकतो लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: November 29, 2021 05:11 PM2021-11-29T17:11:05+5:302021-11-29T17:12:21+5:30

Vivo Android Tablet: Vivo पुढील वर्षी आपला पहिला टॅबलेट लाँच करू शकते. ज्यात Snapdragon 870 प्रोसेसर आणि 8040mAh ची बॅटरी मिळू शकते.  

Vivo to launch its first android tablet with vivo pad name next year   | Android Tablet: Vivo करणार टॅबलेट सेगमेंटमध्ये पदार्पण; 8040mAh बॅटरीसह होऊ शकतो लाँच  

Android Tablet: Vivo करणार टॅबलेट सेगमेंटमध्ये पदार्पण; 8040mAh बॅटरीसह होऊ शकतो लाँच  

Next

Vivo Android Tablet: चिनी कंपनी Vivo आता Android Tablet सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. कंपनीच पहिला टॅबलेट Vivo Pad नावाने बाजारात येऊ शकतो. ऑगस्टमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत विवोच्या व्हाईस प्रेजिडेन्टनी या टॅबलेटची माहिती दिली होती. आता हा टॅब पुढील वर्षी 2022 च्या पूर्वार्धात लाँच केला जाईल, अशी बातमी आली आहे.  

Vivo Pad चे लीक स्पेसिफिकेशन 

विवोच्या आगामी टॅबलेटची कंपीनीनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु GSMArena नं चीनी Tipster Digital Chat Station च्या हवाल्याने माहिती दिली आहे. त्यानुसार विवोच्या टॅबलेट Snapdragon 870 processor असेल. गेल्यावर्षीचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे.  

Vivo Pad हे नाव देखील अजून निश्चित झालं नाही. परंतु कंपनीनं जूनमध्ये European Union Intellectual Property Office (EUIPO) वर Vivo Pad चा ट्रेडमार्क मिळवला. ज्या कॅटेगरीमध्ये हा डिवाइस लिस्ट करण्यात आला आहे त्यात PDAs आणि टॅबलेटचा समावेश आहे. तसेच TUV या सर्टिफिकेशन वेबसाईटवर संभाव्य Vivo Tablet 8040mAh च्या अवाढव्य दमदार बॅटरीसह दिसला आहे.  

BBK Electronics करतेय टॅबलेट सेगमेंटमध्ये पदार्पण  

BBK Electronics समूहातील जवळपास सर्वच इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड टॅबलेट सेगमेंटमध्ये पदार्पण करत आहेत. रियलमीनं आपला टॅब सादर केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत OnePlus आणि Oppo च्या आगामी टॅबलेटच्या बातम्या आल्या आहेत.  

Web Title: Vivo to launch its first android tablet with vivo pad name next year  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.