शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा 'Invisible'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 11:33 IST

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मात्र अनेकदा ग्रुपवर सातत्याने येणाऱ्या मेसेजचा कंटाळा येतो.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.अनेकदा ग्रुपवर सातत्याने येणाऱ्या मेसेजचा कंटाळा येतो.व्हॉट्सअ‍ॅपपासून काही वेळ लांब जाण्याचा विचार केला तर त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बंद करावं लागत अथवा अ‍ॅप डिलीट करावं लागतं.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ऑफिसमधील सहकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर असंख्य ग्रुप केलेले असतात. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मात्र अनेकदा ग्रुपवर सातत्याने येणाऱ्या मेसेजचा कंटाळा येतो. ट्विटर, फेसबुक, स्नॅपचॅटसारख्या प्लॅटफॉर्मवर लॉग आउट करण्याचा एक पर्याय देण्यात आलेला असतो. 

व्हॉट्सअ‍ॅप हे स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन सुरू असेपर्यंत चालू असते. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपपासून काही वेळ लांब जाण्याचा विचार केला तर त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बंद करावं लागत अथवा अ‍ॅप डिलीट करावे लागते. मात्र आता या गोष्टी करायची गरज नाही कारण व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटींग्समध्ये थोडे बदल केल्यास युजर्स त्यांना हवा तितका वेळ व्हॉट्सअ‍ॅपवरून गायब होऊ शकतात. 

व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन टोन डिसेबल करा

व्हॉट्सअ‍ॅपवर नोटिफिकेशनसाठी No Ringtone चा पर्याय नाही आहे. जर नोटिफिकेशनचा आवाज नको असेल तर फोन सायलेंट मोडवर ठेवावा लागतो. पण युजर्स स्वत: देखील सायलेंट टोन तयार करू शकतात. यासाठी एखाद्या शांत ठिकाणी जाऊन दोन मिनिटं ऑडीओ रेकॉर्ड करा. त्यानंतर त्या फाईलला एक नाव द्या. अ‍ॅप सेटींगमध्ये जाऊन ती ट्यून नोटीफिकेशनची रिंग टोन ठेवा.

नोटिफिकेशन पॉप-अप करा डिसेबल

फोनच्या सेटींगनध्ये जाऊन व्हॉट्सअ‍ॅपवर टॅप करा. या ठिकाणी सर्व नोटिफिकेशन डिसेबल करण्याचा पर्याय दिसेल. त्यामध्ये व्हायब्रेशन आणि पॉप अप डिसेबल करा. असं केल्यास एखाद्या नवीन मेसेज आल्यास त्याचं नोटीफिकेशन येणार नाही. तसेच अ‍ॅप ओपन केल्या शिवाय कोणताच मेसेज येणार नाही. 

नोटिफिकेशन लाइट ऑफ करा

स्मार्टफोनमध्ये नोटिफिकेशन लाइट देण्यात आली असेल तर ती ऑफ करा. यासाठी नोटिफिकेशन सेटींगमध्ये जाऊन नोटिफिकेशन लाइटसाठी none सिलेक्ट करा. तसेच  व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आल्यास त्याचा अलर्ट मिळणार नाही. अशा प्रकारे तुम्ही काही काळ व्हॉट्सअ‍ॅपपासून थोडा ब्रेक घेऊ शकता. 

व्हॉट्सअ‍ॅपसाठी मोबाईल डेटा अ‍ॅक्सेस ऑफ करा

स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जाऊन मोबाईल डेटा अ‍ॅक्सेस ऑफ करा. यासाठी अ‍ॅप्समध्ये जाऊन व्हॉट्सअ‍ॅप सिलेक्ट करा. त्यानंतर 'Force Stop' वर टॅप करा. काही फोनमध्ये हा पर्याय वेगळा देण्यात आला आहे. 

बॅकग्राउंड डेटा अ‍ॅक्सेस डिसेबल करा

अ‍ॅप सेटींगमध्ये जाऊन बॅकग्राउंड डेटा अ‍ॅक्सेस डिसेबल करा. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप ओपन केल्यावर मेसेज रिसीव्ह होतील.

 सेटींगमध्ये फोर्स स्टॉपनंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करू नका

फोनमध्ये इंटरनेट सुरू आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करायचा नाही. तसेच मेसेज पाठवलेल्या व्यक्तीला डबल टिक दिसून नये यासाठी अ‍ॅपमध्ये जाऊन फोर्स स्टॉप केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करू नका.

WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

WhatsApp वर असं अ‍ॅक्टिव्ह करा डार्क मोड फीचर 

WhatsApp वर 'ही' ट्रिक वापरून खास मेसेज करा सेव्हWhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. ग्रुपमध्ये सातत्याने अनेक मेसेज येत असतात. तसेच आपल्या मित्रमैत्रिणांकडून मेसेज येत असतात. पण नवीन मेसेज आल्यावर जुने मेसेज मागे जातात. त्यातील महत्त्वाचे अथवा खास मेसेज हवे असल्यास स्क्रिनशॉट्स काढले जातात. मात्र आता असं करण्याची गरज नाही कारण व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स महत्त्वाच्या मेसेजला बुकमार्क देऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवर प्रायव्हेट आणि ग्रुप चॅट अशा दोन्ही ठिकाणी ही फीचर उपलब्ध आहे. याच्या मदतीने युजर्स कोणताही मेसेज सहजपणे दोन वेळा अ‍ॅक्सेस करू शकतात. स्टार मेसेज या नावाने  व्हॉट्सअ‍ॅपवरच हे फीचर ओळखलं जातं. विंडो (Windows), अ‍ॅन्ड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) तीनही प्लॅटफॉर्मवर हे फीचर उपलब्ध आहे.  

WhatsApp चॅटींगची गंमत वाढणार, लवकरच 'हे' धमाकेदार फीचर्स येणार

WhatsApp वर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय? असं तपासा

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर काही कारणास्तव आपण आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना ब्लॉक करू शकतो. त्या व्यक्तींना ब्लॉक केल्यावर मेसेज पाठवला अथवा रिसीव्ह केला जात नाही. तसेच चॅट म्हणजेच संवाद साधता येत नाही. एखाद्या व्यक्तीशी वाद झाला की लगेचच व्हॉट्सअ‍ॅपवर त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जातो. जोपर्यंत आपण अनब्लॉक करत नाही तोपर्यंत फोटो, व्हिडीओ, मेसेज पाठवता येत नाही. कधी कधी आपण एखादया व्यक्तीला मेसेज करतो पण तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहचला आहे की नाही हे समजतच नाही. म्हणजेच त्या व्यक्तीने ब्लॉक केल्याची दाट शक्यता असते. आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का? किंवा आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय का? हे तपासण्यासाठी काही ट्रिक्स आहेत.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान