शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतून करा गुगल ट्रान्सलेटचा ऑफलाईन वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 19:03 IST

गुगलने आपल्या गुगल ट्रान्सलेट या अ‍ॅपच्या ऑफलाईन वापराचा विस्तार करत यात मराठीसह एकूण सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे.

मुंबई -  गुगलने आपल्या गुगल ट्रान्सलेट या अ‍ॅपच्या ऑफलाईन वापराचा विस्तार करत यात मराठीसह एकूण सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे. गुगलने आधीच इंग्रजी व हिंदी भाषांसाठी आपली गुगल ट्रान्सलेट ही सेवा ऑफलाईन वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या अ‍ॅपच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून याचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये आता मराठीसह  तामिळ, तेलगू, कन्नड, गुजराथी, बंगाली व उर्दू अशा एकूण सात भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

अर्थात, आता इंटरनेट नसतांनाही कुणी या सात भाषांमध्ये अनुवादाची सुविधा वापरू शकणार आहेत. यासाठी गुगल ट्रान्सलेटच्या अ‍ॅपची ताजी आवृत्ती आणि ऑफलाईन युजसाठी असणार्‍या टुल्सचे पॅकेज डाऊनलोड करावे लागणार आहे. यासाठी सुमारे ३० मेगाबाईट इतका डाटा लागणार आहे. तथापि, एकदा का हे अपडेट इन्स्टॉल झाले की मग इंटरनेटविना अनुवाद करता येणार आहे. यात संबंधीत अपडेट इन्स्टॉल करतांनाच ते कोणत्या भाषेत वापरायचे आहे याची सेटींग करावी लागणार आहे.

दरम्यान, गुगल ट्रान्सलेटच्या ताज्या अपडेटमध्ये युजर्सला वर नमूद केलेल्या सात भारतीय भाषांसाठी कॅमेरा ट्रान्सलेटची सुविधादेखील देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर आपल्या स्मार्टफोनमधील कॅमेर्‍याच्या मदतीने कोणत्याही इमेजवरील मजकूर मराठी (तसेच अन्य सहापैकी एक) या भाषेत वाचू शकणार आहे. समजा एखाद्या फ्लेक्सवर इंग्रजीतून मजकूर लिहला आहे. आणि तो आपल्याला मराठीत वाचायसा असेल तर आपल्या गुगल ट्रान्सलेट अ‍ॅपमध्ये असणार्‍या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून संबंधीत फ्लेक्समधील मजकूरावर फोकस करावा. यानंतर संबंधीत इंग्रजी मजकूर आपल्याला मराठी (वा अन्य हव्या त्या) भाषेत वाचता येईल.

सध्या ही सुविधा फक्त इंग्रजी भाषेसाठीच वन-वे या पध्दतीत सादर करण्यात आली आहे. म्हणजेच सध्या तरी इंग्रजी भाषेतील मजकूर मराठीसह अन्य भारतीय भाषांमध्ये वापरता येईल. याच्या अगदी विरूध्द म्हणजे मराठीतला मजकूर या माध्यमातून सध्या तरी इंग्रजीत वाचण्याची सुविधा दिलेली नाही. तर दुसरीकडे गुगलने आपल्या गुगल असिस्टंट या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटची व्याप्ती अद्याप वाढवलेली नाही. यामुळे भारतीयांसाठी अद्याप याला फक्त हिंदी भाषेचाच सपोर्ट देण्यात आला आहे. तथापि, यातही लवकरच मराठीसह अन्य भाषांचा सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे.