शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

भारतानंतर US मध्ये देखील TikTok वर बंदी? Google-Apple ला अ‍ॅप काढून टाकण्याचे आदेश 

By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2022 3:27 PM

TikTok अ‍ॅप प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून काढून टाकण्याचे आदेश गुगल आणि अ‍ॅप्पलला देण्यात आले आहेत.  

TikTok वर भारताने जरी बंदी टाकली असली तरी जगभरात या व्हिडीओ शेयरिंग अ‍ॅपची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट जगभरात सर्वाधिक डाउनलोड केल्या गेलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत टिकटॉक गेले कित्येक महिने अग्रस्थानी आहे. युनाटेड स्टेट्समध्ये चीनी कनेक्शन असलेल्या ByteDance कंपनीचं अ‍ॅप TikTok आता USA मध्ये देखील बॅन होऊ शकतं. United States Federal Communications Commission (US-FCC) चे कमिशनर Brendan Carr यांनी अ‍ॅप्पल आणि गुगलला त्यांच्या अ‍ॅप स्टोर्सवरून काढून टाकण्यासाठी पत्र पाठवलं आहे.  

US-FCC कमिशनरचं पत्र 

Brendan Carr यांनी TikTok ला लक्ष्य करत म्हटलं आहे की, “हे अ‍ॅप फक्त एक व्हिडीओ अ‍ॅप नाही. हे मेंढ्याचं कातडं आहे. हे अ‍ॅप संवेदनशील डेटा गोळा करत आहे, जो रिपोर्ट्सनुसार, बीजिंगमधून अ‍ॅक्सेस केला जात आहे. याच्या मुळाशी टिकटॉक एक हेरगिरी करणार साधन आहे जे खाजगी आणि संवेदनशील डेटा मोठ्या प्रमाणावर गोळा करत आहे.”  

Carr यांनी अ‍ॅप्पल आणि गुगलला हे अ‍ॅप याच्या गुप्त डेटा प्रॅक्टिससाठी काढून टाकण्यास सांगितलं आहे. ट्वीटच्या माध्यमातून दोन्ही कंपन्यांना पाठवण्यात आलेलं पत्र शेयर केलं आहे. 24 जूनला लिहिण्यात आलेल्या या पत्राला 8 जुलै पर्यंत उत्तर द्यावं लागेल. ज्यातून कंपन्यांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल की, “TikTok च्या फसव्या प्रतिनिधित्व आणि वागणुकीसह US युजर्सचा खाजगी आणि संवेदनशील डेटा बीजिंगमधील लोकांनी अ‍ॅक्सेस केल्यानं, कशाप्रकारे कोणत्याही अ‍ॅप स्टोरच्या पॉलिसीजचं उल्लंघन होत नाही.”   

Carr यांनी पत्रात बजफीड न्यूजच्या रिपोर्टचा हवाला देऊन म्हटलं आहे की चीनमध्ये ByteDance चे कर्मचारी वारंवार अमेरिकन युजर डेटाचा वापर करत आहेत. पब्लिकेशनच्या माहितीनुसार TikTok च्या अंतर्गत मीटिंगच्या ऑडियो रेकॉर्डिंगमध्ये नऊ वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांनी चौदा वेगवेगळे विधान केले आहेत, ज्यातून सप्टेंबर 2021 आणि जानेवारी 2022 दरम्यान अमेरिकन युजर्स डेटा त्यांना मिळत होता, असं समजतं.  

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकtechnologyतंत्रज्ञान