शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

यूपीआयद्वारे 95000 लोकांची फसवणूक; जाणून घ्या कसे टाळता येईल स्कॅम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 15:05 IST

upi fraud cases : ऑनलाइन व्यवहारांसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हे आपल्यामध्ये क्रांतीसारखे आले आहे. यूपीआयने भारतात व्यवहार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. 

भारतात डिजिटल व्यवहारांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. ऑनलाइन शॉपिंग, शाळेची फी, पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लोक डिजिटल पद्धतींचा अवलंब करत आहेत. ऑनलाइन व्यवहारांसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हे आपल्यामध्ये क्रांतीसारखे आले आहे. यूपीआयने भारतात व्यवहार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. 

देशात मोठ्या प्रमाणावर रोखीचे व्यवहार होतात, पण आता यूपीआय पेमेंटची क्रेझही सातत्याने वाढत आहे. मात्र, यूपीआयच्या झपाट्याने वाढ होत असल्याने फसवणुकीची प्रकरणेही समोर येत आहेत. आजच्या काळात व्हॉट्सअॅप स्कॅम, पार्ट-टाइम जॉब स्कॅम, सिनेमा स्कॅम यांसारख्या ऑनलाइन स्कॅमची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. यूपीआय देखील स्कॅमर्सच्या नजरेतून सुटलेले नाही. यूपीआयद्वारे फसवणूक झाल्याची घटना नवीन नाही. 

गेल्या काही वर्षांपासून यूपीआय ​​फसवणुकीची हजारो प्रकरणे नोंदवली जात आहेत. हा आकडा झपाट्याने वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये यूपीआय फसवणुकीची 77,000 प्रकरणे नोंदवली गेली. 2021-22 मध्ये, यूपीआय फसवणूक प्रकरणांची संख्या 84,000 झाली. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2022-23 दरम्यान, देशात 95,000 हून अधिक यूपीआय फसवणुकीची प्रकरणे नोंदवण्यात आली. यूपीआयच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

सायबर गुन्हेगार यूपीआयच्या माध्यमातून लोकांची अनेक प्रकारे फसवणूक करतात.पैसे रिफंड मागण्याचा बहाना : स्कॅमर्स लोकांच्या यूपीआय खात्यात पैसे ट्रान्सफर करतात आणि म्हणतात की, ते चुकून ट्रान्सफर झाले. यानंतर लोकांना हे पैसे परत करण्यास सांगितले जाते. त्यासाठी यूपीआयची लिंक पाठवली जाते. तुम्ही या लिंकवर क्लिक करताच, तुमच्या फोनचे नियंत्रण स्कॅमर्सकडे जाते आणि ते डिजिटल वॉलेट आणि बँक खात्यांमधून पैसे चोरतात.

QR कोडद्वारे फसवणूक : स्कॅमर्स QR कोडद्वारे फसवणूक करतात. सायबर ठग लोकांना क्यूआर कोड पाठवतात. तुम्ही UPI पिन टाकताच तुमच्या खात्यातून पैसे डेबिट केले जातात.

या पद्धती यूपीआय फसवणूक टाळण्यात मदत होऊ शकते- जर कोणी म्हणत असेल की त्याने चुकून तुमच्या यूपीआय खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत, तर आधी त्यासंबंधी सखोल चौकशी करा. त्या व्यक्तीच्या ओळखीची पुष्टी करा आणि कोणतीही लिंक आली तर त्यावर क्लिक करू नका.- तुमचा यूपीआय पिन कोणाशीही शेअर करू नका. तो फक्त स्वतःशी व्यवहार करण्यासाठी वापरा.- लेटेस्ट स्कॅम आणि फ्रॉड करण्याच्या पद्धतींवर लक्ष ठेवा. यावरून तुम्हाला कळेल की स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी कसे डावपेच अवलंबतात.

टॅग्स :fraudधोकेबाजीtechnologyतंत्रज्ञान