शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

UPI 123PAY: आता फीचर फोनमधून पाठवता येणार पैसे, RBIने आणली खास सुविधा; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 16:24 IST

RBIने फीचर फोनमधून बँक खात्यात पैसे पाठवण्याची सुविधा सुरू केली आहे, यासाठी इंटरनेटची गरज पडणार नाही.

UPI 123PAY: रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतेच UPI Lite लाँच केले. पासवर्डशिवाय 200 रुपयांपर्यंतच्या छोट्या रकमेसाठी हे खास अॅप लॉन्च करण्यात आले. यानंतर आता UPI चे आणखी एक व्हर्जन, 123Pay (UPI 123PAY) आणले आहे. याद्वारे फीचर फोनमधून(साधा कॉलिंग फोन) पेमेंट करता येणार आहे. 

आरबीआयने केले लॉन्चआरबीआयने UPI Lite आणि UPI123pay लॉन्च केले आहे. पण, या दोन्हीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार, UPI Lite ला सध्या इंटरनेटची आवश्यकता आहे तर UPI123pay ला इंटरनेटची आवश्यकता नाही. UPI123pay खास फीचर फोनसाठीच तयार करण्यात आले आहे.

UPI123pay का लॉन्च केलेदेशातील कॅश(रोख) आधारित व्यवहार कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने UPI तंत्रज्ञन सुरू केले. याद्वारे थेट बँक खात्यांमधून पैशांचा व्यवहार होतो. UPIवर ग्राहकांना बँकेशी संबंधित इतर माहितीही मिळते. पण, यासाठी स्मार्टफोनची गरज आहे. पण, देशातील मोठी लोकसंख्या स्मार्टफोनपासून अजूनही वंचित आहे. यामुळेच रिझर्व्ह बँकेने UPI123pay लाँच केले आहे.

UPI123pay काय आहे?स्मार्टफोनसोबतच आता लोक त्यांच्या फीचर फोनवरून सर्व प्रकारचे UPI व्यवहार करू शकतात. यासाठी खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

1. प्रथम तुमचे बँक खाते UPI123pay शी लिंक करावे लागेल. यासाठी IVR क्रमांकावर (08045163666, 08045163581 किंवा 6366200200) कॉल करा.

2. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून UPI ​​पिन तयार करा.

3. आता आयव्हीआर नंबरवर कॉल करून मनी ट्रान्सफर, एलपीजी बिल किंवा वीज बिल यासारख्या सेवांचा पर्याय निवडा.

4. पैसे पाठवण्यासाठी पुढील व्यक्तीचा फोन नंबर अॅड करण्यापूर्वी कोणती सुविधा हवी आहे, हे निवडणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला रक्कम आणि पिन टाकावा लागेल.

5. यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील आणि संबंधित व्यक्तीच्या खात्यात ट्रांसफर केले जातील.

टॅग्स :google payगुगल पेtechnologyतंत्रज्ञान