शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Union Budget 2025 : फक्त स्मार्टफोन अन् गॅझेट्स स्वस्त होणार नाहीत, चीनलाही धक्का बसणार; सरकारचा मोठा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 19:16 IST

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित अनेक घटकांवरील सीमाशुल्क काढून टाकण्याची घोषणा केली आहे.

Union Budget 2025 ( Marathi News ) :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये ११ मोठ्या घोषणा केल्या. आता नवीन कर प्रणालीमध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर द्यावा लागणार नाही. तसेच मोबाईल फोनशी संबंधित काही घटकांवरील आयात शुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशात लॉकर उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. या निर्णयाचा थेट फायदा Apple आणि Xiaomi सारख्या परदेशी कंपन्यांना तसेच भारतीय कंपन्यांना होईल. 

गेल्या सहा वर्षांत भारताचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन दुप्पट होऊन ११५ अब्ज डॉलर्स झाले आहे. यासह, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे.

दारूगोळा, मिसाइल्स आन् फायटर जेट...; भारतानं डिफेंस बजेटमध्ये हजारो कोटी वाढवून चीन-पाकला दिला टन्शन

काउंटरपॉइंटच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये भारताच्या स्मार्टफोन बाजारातील एकूण महसुलात अॅपलचा वाटा २३ टक्के आहे. यानंतर, सॅमसंग २२ टक्के सह दुसऱ्या स्थानावर आहे.

या घटकावरुन टॅक्स हटवला बजेटमध्ये ज्या मोबाईल घटकांवरून कर काढून टाकण्यात आला आहे. त्यामध्ये प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली, कॅमेरा मॉड्यूल आणि यूएसबी केबल यांचा समावेश आहे. पूर्वी या घटकांवर २.५ टक्के कर आकारला जात होता.

पीसीबीए चे पार्ट

कॅमेरा मॉड्यूल

कनेक्टर

वायर्ड हेडसेटचा कच्चा माल

मायक्रोफोन

रिसीव्हर

यूएसबी केबल

फिंगरप्रिंट रीडर

मोबाईल फोन सेन्सर

यासोबतच एलसीडी आणि एलईडी पॅनल्सवरील कस्टम ड्युटी देखील शून्य करण्यात आली आहे. यामुळे टीव्ही, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या किमती कमी होतील.

भारताचा फायदा काय?

डोनाल्ड ट्रम्प 'अमेरिका फर्स्ट' धोरण स्वीकारत आहेत. ते अमेरिकेत अधिकाधिक उत्पादन युनिट्स आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, भारताला शुल्क कमी करून अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉरचा फायदा घेण्याच्या स्थितीत राहायचे आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीत भारताचा वाटा वाढवण्यासही वाव मिळेल.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आयटी मंत्रालयाने इशारा दिला होता की, जर सरकारने परदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी शुल्क कमी केले नाही तर स्मार्टफोन निर्यातीच्या शर्यतीत भारत चीन आणि व्हिएतनामपेक्षा मागे पडू शकतो. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, निर्मला सीतारमण यांनी सीमाशुल्काचे सुसूत्रीकरणची घोषणा केली होती. 

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५technologyतंत्रज्ञानchinaचीनNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन