बाबो! फोन आहे कि पावरबँक? 13,200mAh बॅटरीसह Ulefone Power Armor 13 लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: July 22, 2021 07:16 PM2021-07-22T19:16:35+5:302021-07-22T19:18:08+5:30

13,200mAh Battery Phone: Ulefone Power Armor 13 मध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे, हा फोन AliExpress आणि Banggood च्या माध्यमातून विकत घेता येईल 

Ulefone power armor 13 launch with 13200mah massive battery price specification details  | बाबो! फोन आहे कि पावरबँक? 13,200mAh बॅटरीसह Ulefone Power Armor 13 लाँच; जाणून घ्या किंमत 

Ulefone Power Armor 13 ची खासियत यातील 13,200 एमएएच दमदार बॅटरी आहे

Next

Ulefone कंपनी अनोखे स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी ओळखली जाते. या कंपनीच्या Power सीरिजचे फोन्स मोठ्या आणि दमदार बॅटरीसह लाँच केले जातात. आता या सीरिजमध्ये कंपनीने Ulefone Power Armor 13 स्मार्टफोन 13,200mAh क्षमतेसह लाँच केला आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे हा एक रगेड स्मार्टफोन आहे. म्हणजे हा उंचावरून पडला तरी हा फोन तुटणार नाही.  (Ulefone Power Armor 13 launched with 13,200mAh battery and rugged design) 

Ulefone Power Armor 13 चे स्पेसिफिकेशन्स  

Ulefone Power Armor 13 मध्ये 6.81-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आलं आहे. या Ulefone मध्ये कंपनीने मीडियाटेक हीलियो जी95 प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालतो. हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. ही स्टोरेज मायक्रोएसडीने 1 टीबीपर्यंत वाढवता येते.  

फोटोग्राफीसाठी Ulefone Power Armor 13 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, यात मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड-अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा चौथा कॅमेरा मिळतो. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

Ulefone Power Armor 13 ची खासियत यातील 13,200 एमएएच दमदार बॅटरी आहे, ही बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगसह येते. तसेच यात 15 वॉट व्हायरलेस चार्जिंग आणि 5 वॉट रिवर्स व्हायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा फोन वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ आणि शॉकप्रूफ आहे. Ulefone Power Armor 13 स्मार्टफोन AliExpress आणि Banggood वरून विकत घेता येईल. अली एक्सप्रेसवर हा फोन 499.99 यूएस डॉलर (सुमारे 37,241 रुपये) ते 583.32 यूएस डॉलर (सुमारे 43,448 रुपये) मध्ये लिस्ट करण्यात आला आहे.  

Web Title: Ulefone power armor 13 launch with 13200mah massive battery price specification details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.