शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2019 : दिवाळीसाठी खास इमोजीने लखलखणार Twitter 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 12:38 IST

दिवाळीनिमित्त ट्विटर आपल्या युजर्ससाठी दिवाळी 2019 चा खास इमोजी लाँच करणार आहे.

ठळक मुद्देदिवाळीनिमित्त ट्विटर आपल्या युजर्ससाठी दिवाळी 2019 चा खास इमोजी लाँच करणार आहे.दिवाळीचे औचित्य साधून ट्विटरने लाईट्स ऑन इमोजीसोबतच टाईमलाईन देखील आकर्षक केली आहे.ट्विटरच्या डार्क मोडमध्ये डिम आणि लाईट्स ऑन असे दोन व्हेरिएशन देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी फीचर आणत असतं. संवाद अधिक पारदर्शी करता यावा यासाठी ट्विटर लवकरच एक नवीन फीचर रोलआऊट करणार आहे. दिवाळीनिमित्त ट्विटर आपल्या युजर्ससाठी दिवाळी 2019 चा खास इमोजी लाँच करणार आहे. यावर दिवाळीचे औचित्य साधून ट्विटरने लाईट्स ऑन इमोजीसोबतच टाईमलाईन देखील आकर्षक केली आहे. इमोजी लाँच झाल्यानंतर युजर्सना ट्विटर प्लॅटफॉर्मवर डार्क मोडमध्ये एक दिवा तेवत असताना दिसणार आहे. त्याचा प्रकाश युजर्स कमी जास्त करू शकतात. यासाठी एक फीचरही लवकरच येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर नवा इमोजी लाईट मोडमध्ये दिसणार आहे. मात्र युजर्सने डार्क मोडमध्ये पाहिल्यावर त्याचा खरा आनंद घेता येणार आहे. ट्विटरच्या डार्क मोडमध्ये डिम आणि लाईट्स ऑन असे दोन व्हेरिएशन देण्यात आले आहेत. 29 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीचा खास इमोजी असणार आहे. ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करून 11 भाषेत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात येणार आहे.  बंगाली, गुजराती, इंग्रजी, हिंदी, मराठी, पंजाब या भाषांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये युजर्सना ट्विटर प्लॅटफॉर्मवर डार्क मोडमध्ये एक दिवा तेवत असताना दिसणार आहे. 

ट्विटरवरील थ्रेड अचानक डिलीट झाल्यास ते थ्रेड का गायब झाले याचं स्पष्टीकरण ट्विटर देणार आहे. काही आठवड्यात हे फीचर युजर्सना दिसणार आहे. 'This tweet is unavailabe' च्या जागी ते ट्वीट का गायब झालं याचं कारण दिसणार आहे.  ट्विटरवर अनेकदा काही कन्व्हर्सेशनचे ट्वीट गायब झालेले दिसतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती मिळत नाही. ट्वीट गायब झाल्याने लोक गोंधळून जातात. त्यामुळेच ट्विटर आता युजर्सना ट्वीट का गायब झालं यामागचं कारण सांगणार आहे. प्रामुख्याने ट्वीट गायब झाल्यावर 'This tweet is unavailable' असं दाखवण्यात येतं. मात्र आता नवं फीचर रोलआऊट झाल्यावर गायब झाल्यामागचं नेमकं कारण आणि तपशील मिळणार आहे. 

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात. 

टॅग्स :Twitterट्विटरtechnologyतंत्रज्ञानDiwaliदिवाळी