शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

टंबो मोबाईल्सचे भारतात पदार्पण

By शेखर पाटील | Updated: May 31, 2018 18:10 IST

टंबो मोबाईल्स या कंपनीने भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत प्रवेश करत टंबो टीए-३ हे मॉडेल ग्राहकांना सादर केले आहे.

टंबो मोबाईल्स या कंपनीने भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत प्रवेश करत टंबो टीए-३ हे मॉडेल ग्राहकांना सादर केले आहे.

टंबो मोबाईल्स कंपनी भारतात आपली उत्पादने सादर करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच आली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या कंपनीने टंबो टीए-३ या मॉडेलच्या माध्यमातून बाजारपेठेत एंट्री केली आहे. या मॉडेलचे मूल्य ४,९९९ रूपये आहे. भारतात एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विकले जातात. नेमकी हीच बाब लक्षात घेत, या कंपनीनेही याच सेगमेंटवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. हा स्मार्टफोन जेट ब्लॅक, शँपेन आणि मेटॅलिक ब्ल्यू या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये ऑफलाईन पध्दतीत बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये ४.९५ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आला असला तरी याचे रेझोल्युशन मात्र नेमके सांगण्यात आलेले नाही. यामध्ये मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी६७३७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज ६४ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.

टंबो टीए-३ या मॉडेलमध्ये ड्युअल फ्लॅशयुक्त ५ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एलईडी फ्लॅशयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हे एंट्री लेव्हलचे मॉडेल असले तरी यात फेस अनलॉक हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. तर याच्या कॅमेर्‍या अ‍ॅपमध्ये ब्युटीसह विविध मोड प्रदान करण्यात आले आहेत. तर यातील बॅटरीची क्षमता आणि अँड्रॉइड ओएसच्या आवृत्तीबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान