शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

कॉल करणाऱ्याचे नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार; Spam Calls पासून सुटका होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 16:20 IST

हे नाव युजरच्या केवायसीनुसार असेल. म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर सिम असेल त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला दिसेल.

नवी दिल्ली - मोबाईलवर येणाऱ्या Spam Calls मुळे प्रत्येक जण त्रस्त असतो. तुम्ही कुठलाही फिचर वापरला तरी Unknown आणि Spam Calls पासून वाचणं कठीण आहे. कर्ज, विविध ऑफर्ससाठी मोबाईल ग्राहकांना कॉल्स येत असतात. आता या कचाट्यातून युजर्सला बाहेर काढण्यासाठी TRAI नं नवीन फिचरवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नको असलेल्या कॉल्सपासून तुमची सुटका होण्याची शक्यता आहे. 

काय आहे नवीन फिचर? भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चे नवीन फिचर कॉलर आयडेंटिशी निगडीत आहे. रिपोर्टनुसार, लवकरच तुम्हाला येणाऱ्या कॉलसोबतच कोणत्या व्यक्तीने तुम्हाला कॉल केलाय त्याचं नावही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. हे नाव युजरच्या केवायसीनुसार असेल. म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर सिम असेल त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला दिसेल. हा नियम लागू होताच, वापरकर्त्यांना त्या कॉलरचे नाव देखील दिसेल, ज्याचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह नसेल. ट्राय पुढील तीन आठवड्यात हे फीचर लॉन्च करू शकते.

Truecaller चं अस्तित्व धोक्यात?सध्या अशा फीचर्ससाठी यूजर्सला Truecaller सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सची गरज आहे. पण या अ‍ॅप्सचा सर्वात मोठा मायनस पॉइंट म्हणजे त्यांचा डेटाबेस. Truecaller सारख्या अ‍ॅप्सचा सर्व डेटा क्राउडसोर्स केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर १००% विश्वास ठेवता येत नाही. तुम्हाला KYC आधारित प्रणालीवर पूर्ण विश्वास ठेवता येईल. लोकांच्या मनात असाही प्रश्न येतो की, ही सेवा सुरू झाल्यानंतर Truecaller सारखे अ‍ॅप्स संपतील. ट्रायच्या या आगामी सेवेची चर्चा सुरू झाली तेव्हा Truecaller ने या सेवेशी स्पर्धा करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितले होते. WhatsApp ला जोडणार नवीन फिचर?अशाच आणखी एका सेवेवर काम सुरू आहे, ज्याद्वारे युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपवर कॉलरचं नाव पाहायला मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक लोक फसवणुकीच्या कॉलला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत ट्राय अशा फीचरवर काम करत आहे, जेणेकरून ग्राहकांना त्यांना कोण कॉल करतंय याची माहिती कळेल मात्र, व्हॉट्सअ‍ॅपवर ही सेवा कशी असेल याबाबत फारशी माहिती नाही. एकूणच, ही सेवा सुरू केल्यानंतर, युजर्सना एक चांगला कॉलिंग अनुभव मिळेल हे नक्की

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय